युवक ही राष्ट्राची शक्ती आहे राष्ट्र निर्माण मध्ये युवाशक्तिची खुप आवश्यकता असून त्यांनी अखंड प्रचंड पुरुषार्थ करावा कोणत्याही कार्यामध्ये विकल्प रहित संकल्प करावा, शरीरसदृढतेसाठी पारंपारिक व्यायामाबरोबरच श्वसनतंत्रसाठी प्राणायाम चा नियमित अभ्यास करावा असे मत पतंजली योगपीठ हरिद्वार चे केंद्रीय युवा प्रभारी स्वामी आदित्यदेवजी यांनी व्यक्त केले. मारकड कुस्ती केंद्रामध्ये पतंजलिच्या वतीने आयोजित व्यक्तिमत्व विकास व युवा संस्कार शिबिरामध्ये युवा कुस्तीगीरांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी युवकांचे मनोबल आत्मबल वाढवण्यासाठी प्राणायाम प्रकारचे प्रशिक्षण दिले.
.महिला समितीच्या वतीने सायरा आतार राधिका अनपट वर्षा नागणे, जयश्री सरवदे, उमा झोळ,संपदा जाधव,यांनी औक्षण केले.
कुस्ती केंद्रातील युवकांनी यावेळी मल्लखांब, रेसलिंग ,कुस्तीची प्रात्यक्षिके करून दाखवली.कुस्ती केंद्राचे संचालक राष्ट्रीय सुवर्णपेदक विजेते मल्ल पै. सागर मारकड आणि कुस्ती संघाचे अध्यक्ष मारुती मारकड राजीव भाई दिक्षित राज्य पुरस्कार प्राप्त डॉ.सुदीप ओहोळ यांचा आदित्य देवजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्य प्रभारी आचार्य अविनाश सहप्रभारी प्रितीश लाड, दादासाहेब कारंडे, मारुती पवार, दत्तात्रेय अनपट, प्रशांत हेळकर, गोपीचंद गलांडे, हमीदभाई आतार, उदय शिंदे, राजेंद्र चव्हाण,भिमराव वणवे काकासाहेब मांढरे,सुनिल पवार उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिभिषन खबाले, रामेश्वरजी साठे, भालचंद्र भोसले,चंद्रकांत देवकर, सुनिल कांबळे, देवराव मते ,बाजीराव शिंदे, काशिनाथ पारेकर, सचिन पवार,डाॅ विक्रम पोतदार आण्णासाहेब चोपडे,यांनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवाभारत राज्य कार्यकारणी सदस्य प्रशांत गिड्डे यांनी केले तर सूत्रसंचालन रविंद्र परबत आणि आभार प्रदर्शन शरद झोळ यांनी केले.
टिप्पण्या