*इंदापूर तालुक्याचे तहसिलदार मा. श्रीकांत पाटील यांच्या वर हल्ला करणाऱ्या आरोपीस त्वरित अटक करून त्यांना कठोर शिक्षा करावी -अनिताताई खरात*
इंदापूर:- आज सकाळी इंदापूरचे तहसीलदार श्री.श्रीकांत पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला त्याचा मी प्रथमतः निषेध करते, तसेच पोलीस प्रशासनाला विनंती करते की जे कोणी हल्लेखोर असतील त्यांना ताबडतोब अटक करून योग्य ती कारवाई करावी व इथून पुढे असे हल्ले होणार नाहीत यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना योग्य ते संरक्षण द्यावे शासकीय अधिकाऱ्यावर हल्ले होणे ही बाब अतिशय निंदनीय आहे, शासकीय अधिकारी हे तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात आणि अशा अधिकाऱ्यावर हल्ला करणे हे लोकशाहीला धरून नाही, आणि इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे तर नेहमीच आपल्या कामात तत्पर असतात आणि अशा अधिकाऱ्यावर हल्ला होणे ही बाब अतिशय दुर्दैवी आहे तरी मी या गोष्टीचा निषेध करते.
सौ अनिताताई नानासाहेब खरात- तेजपृथ्वी ग्रुप संस्थापक अध्यक्षा महारष्ट्र राज्य.यांनी पोलिस स्टेशन ला निवेदन दिले.
टिप्पण्या