सलग 5 वर्ष 100 % निकालाची परंपरा कायम राखत विद्यालयाची यशस्वी वाटचाल.
इंदापूर:- जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचालित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मधील एच.एस.सी .बोर्ड परीक्षा मार्च 2024 मध्ये प्रशालेतील एकूण 196 विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते, त्यापैकी 54 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहे, 123 विद्यार्थी प्रथम क्लासने उत्तीर्ण झाले आहेत, तर 19 विद्यार्थी द्वितीय क्लासने उत्तीर्ण झाले आहेत.
*विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत.*
1) घाडगे अनिषा देविदास 87.83%
2) बोडके श्रीधर विजय 84.17%
3 ) जगताप अनुष्का अनंता 83.67%
4 ) नागटिळक नेहा अशोक 83.17%
5 ) नागटिळक निकिता अशोक 83%
5) ठवरे ज्योती सोपान 83%
5 ) सुर्यवंशी प्रज्वल भारत 83%
प्रशालेतील एकूण 196 विद्यार्थ्यांपैकी 170 विद्यार्थी हे विज्ञान विभागाचे होते व वाणिज्य विभागाचे 26 विद्यार्थी होते त्यापैकी *विज्ञान विभागातील पीक विज्ञान या विषयात 200 पैकी 200 गुण मिळवणारे 25 विद्यार्थी असल्याने विद्यालयाच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.*
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश संपादन केले, त्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.श्रीमंत ढोले सर , उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा ढोले मॅडम, सचिव श्री. हर्षवर्धन खाडे सर, संस्थेचे प्रमुख सल्लागार श्री. प्रदीप गुरव साहेब, संस्थेचे प्रशासक श्री. गणेश पवार सर, प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या
टिप्पण्या