मुख्य सामग्रीवर वगळा

*इंदापूर येथे दिनांक १५ ते १७ जून रोजी जैन तीर्थंकर भगवान मुनीसुव्रतनाथ मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळा*

इंदापूर येथे दिनांक १५ ते १७ जून रोजी जैन तीर्थंकर भगवान मुनीसुव्रतनाथ मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळा.
इंदापूर येथील श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर प्रांगणात कायोत्सर्ग अवस्थेत असलेल्या तीर्थंकर भगवान मुनीसुव्रतनाथ मूर्तीचा महामस्तका भिषेक सोहळा दिनांक १५ ते १७ जून या कालावधीत होणार आहे. शनिग्रह अरिष्ट निवारक २७ फूट उंच असलेल्या तीर्थंकर भगवान मुनीसुव्रतनाथ मूर्तीस १३ वर्ष पूर्ण 
झाल्यानिमित्त या महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा यांनी दिली.
डॉ. शहा पुढे म्हणाले, प्रथमाचार्य चारित्र्य चक्रवर्ती १०८ श्री 
शांतीसागर महाराज यांच्या परंपरेप्रमाणे तसेच गणाधिपती गणाधराचार्य १०८ श्री कुंथूसागर महाराज व प्रज्ञाश्रमण सरस्वताचार्य श्री देवनंदी महाराज यांच्या आशीर्वादाने  आर्ष परंपरेचे परम प्रभावशाली युगल मुनिराज १०८ श्री अमोघकिर्ती महाराज व अमरकिर्ती महाराज यांच्या मंगल सानिध्यात या २७ फूट उंच तीर्थंकर भगवान मुनीसुव्रतनाथ मूर्तीचा ३३ मंगलद्रव्यांनी   महामस्तकाभिषेक सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्यास राज्यातून हजारो श्रावक श्राविका उपस्थित राहणार आहेत. दिनांक १५ जून रोजी ध्वजा रोहन, भगवान मुनीसुव्रतनाथ विधान, युगल मुनीराज यांचे प्रवचन, दिनांक १६ जून रोजी महर्षी विधान, प्रवचन तर दिनांक १७ जून रोजी सन्माननीय मान्यवरांच्या सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.या कालावधीत रोज दुपारी तीन वाजता महामस्तकाभिषेक होणार आहे. यानिमित्त प्रतिष्ठाचार्य पंडित दीपक उपाध्ये, महावीर उपाध्ये, दीपक उपाध्ये, संगीत कार सुयोग पाटील यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी किशोरकुमार शहा, डॉ. सतीश दोशी, डॉ. शीतल शहा, सुशील शहा, किरण शहा,सचिन शहा, श्रीमती सुजाता शहा, रमणिकलाल कोठाडीया, बाबूभाई गांधी, मिहिर गांधी, डॉ. विकास शहा, श्रेणिक शहा, प्रिया शहा, रमेश वडुजकर, नमन गांधी, अनिल जमगे, डॉ. रविकिरण शहा, शरद दोशी, इंद्रराज दोशी, नंदकुमार दोशी, रविंद्र गांधी, परेश दोशी, सुहास शहा, दिलीप गांधी, जवाहर 
वाघोलीकर, डॉ. सागर दोशी, डॉ. संतोष दोशी, प्रकाश दोशी, इंद्रजित दोशी, अनंतलाल दोशी, प्रकाश अंबुडकर, अमोल दोशी, महावीर व्होरा, वैभव शहा, डॉ. मिलिंद शहा, प्रीतम शहा, डॉ. सुनील शहा आदी सन्माननीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत. फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज, श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था तसेच मुंबई येथील श्री वीरशासन प्रभावना ट्रस्ट हे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत तर श्री १००८ शांतीनाथ दिगंबर  जैन मंदिर ट्रस्ट चे सर्व विश्वस्त यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. या धार्मिक  कार्यक्रमात विविध ३७ प्रकारच्या धार्मिक सेवा क्रिया होणार असून ज्यांना या कार्यक्रमात सक्रिय योगदान द्यायचे आहे, त्यांनी मंदिर ट्रस्टच्या इंदापूर जनता सहकारी बँकेच्या ( IFSC JSBP0000032 ),
सेव्हींग खाते क्रमांक 032220100018718 या खात्यावर दान निधी पाठवावा असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा यांच्याशी 9822454340 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते