पुरंदर तालुक्यातील वाल्हे नजीक कामठवाडी येथे अज्ञात चोरट्याने दुचाकी सह सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे वाल्हे गावच्या हद्दीतील कामठवाडीत रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने फारूखपाशा हुसेनभाई इनामदार यांची होंडा कंपनीची दुचाकी( क्र. एम. एच.१२एफ.एच.१५९७) तर लक्ष्मण भाऊसाहेब नवले यांच्या घरातून ५ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला आहे.
या घटनेची फिर्याद फारूखपाशा इनामदार यांनी वाल्हे पोलीस चौकीत दाखल केली आहे.त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रशांत पवार हे करीत आहेत
टिप्पण्या