* डाॅ.संदेश शहा आणि डॉ. राधिका शहा हे इंदापूर शहरातील वैद्यकिय व्यवसाय करणारे आदर्श सामाजिक जोडपे असून यांच्या सहजीवनास आज ३० वर्ष पूर्ण झाली*
इंदापूर : डॉ. संदेश शहा आणि डॉ. राधिका शहा हे इंदापूर शहरातील वैद्यकिय व्यवसाय करणारे आदर्श सामाजिक जोडपे असून यांच्या सहजीवनास आज ३० वर्ष पूर्ण झाली. " एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ तसेच जगी एकच धर्म सर्वांना प्रेम अर्पावे " या तत्त्वाने त्यांची आता पर्यंतची वाटचाल आहे. सर्व जिव्हाळ्याच्या सकारात्मक शक्ती एकत्र करून इंदापूर शहर व तालुक्याचा नावलौकिक वाढावा यासाठी त्यांनी निरपेक्ष वृत्तीने अनमोल योगदान दिले.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सुमारे ३० हजार हून जास्त वारकऱ्यांना त्यांनी एक महिन्याची औषधे मोफत देवून औषधदान हे सर्वश्रेष्ठ दान याचा प्रत्यय दिला आहे.
इंदापूर रोटरी क्लबचे सन २०१४-१५ चे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी १२४ क्लब मधून इंदापूर क्लब ला पहिल्या पाच मध्ये नेत एकूण २१ पुरस्कार मिळवून दिले. पैकी ५ पुरस्कार आंतरराष्ट्रीय रोटरी प्रतिनिधीच्या हस्ते त्यांना देण्यात आले. या काळात त्यांनी इंदापूर तालुक्यातील गोखळी, तरंगवाडी, विठ्ठलवाडी या गावात ओढा खोली करण व रुंदीकरण करून त्या गावांची पाणीटंचाई दूर केली. विठ्ठलवाडी येथील कार्यक्रमास राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमदार दत्तात्रय भरणे मामा तसेच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रदीपदादा
गारटकर, उपाध्यक्ष मुकुंदशेठ शहा आदी मान्यवर उपस्थित होते. रोटरी जिल्हा प्रांतपाल विवेक अरान्हा, मीनाक्षी बोराटे, अभय गाडगीळ, पंकज शहा, वसंतराव मालुंजकर आदींचे सहकार्य लाभले.
इंदापूर तालुक्यातील युवापिढीसाठी त्यांनी पुणे येथील चाणक्य अकॅडमीच्या सहकार्याने तसेच इंदापूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, अल्फाबाईट संगणक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तुषार रंजनकर यांच्या सहकार्याने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी उपस्थित २२०० मुलांपैकी आज ३५० हून जास्त युवापिढी विविध ठिकाणी कार्यरत आहे.
नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर यांच्यासमवेत काम करत असताना त्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यांच्या युवापिढीसाठी गणेशवाडी येथे सुरू केलेल्या तुर खरेदी केंद्राने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. तालुक्यात त्यांनी २५ ठिकाणी नेहरू युवा केंद्रे सुरू करून वृक्षारोपण, आरोग्य जनजागृती, जल व माती संवर्धन आदी उपक्रम राबविले आहेत. या माध्यमातून पर्यावरण संतुलन करण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमास केंद्र शासनाच्या युवक व क्रीडा मंत्रालयाकडून त्यांना प्रथम पुरस्कार मिळाला होता.
त्यांनी दैनिक सकाळ मध्ये २२ वर्ष, दैनिक लोकसत्ता मध्ये तीन वर्ष, साप्ताहिक बारामती वैभव मध्ये दोन वर्ष तालुका बातमीदार म्हणून काम केले. आता ते दैनिक बंधुप्रेम मध्ये कार्यकारी संपादक म्हणून काम करत आहेत. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एम. डी. शेख, सुरेश शहा, डॉ. विकास शहा, अतुल तेरखेडकर सर, स्वर्गीय अनंतराव जकाते, स्वर्गीय तात्या बिचकर, अभिजित बेल्हेकर, अनिल कांबळे, सलीम शेख, तानाजी काळे, शैलेश काटे, महेश स्वामी, सुरेश जकाते यांचे मार्गदर्शन, सहकार्य लाभले. दैनिक सकाळ चे संपादक एस.के. कुलकर्णी, विजय कुवळेकर, यमाजी मालकर, अनंत दीक्षित, अरुण खोरे, सम्राट फडणीस, रमेश डोईफोडे सर यांच्या संस्कारात त्यांची पत्रकारिता प्रगल्भ झाली. पत्रकारिता करत असताना त्यांनी सत्य मेव जयते या तत्त्वाने पत्रकारिता केली. त्याची त्यांना मोठी किँमत मोजावी लागली. जाहिरातदारांनी त्यांचे साडेपाच लाख रुपये बुडविले. मात्र खचून न जाता समाजातील जे चांगले आहे, त्यास सर्वोच्च प्रसिध्दी देण्याचे काम ते करत असतात. इंदापूर येथे पत्रकार भवन व्हावे यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कडे तत्कालीन सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न केले होते मात्र नगरपरिषदेच्या तत्कालीन नगराध्यक्षा सौ. अलका कृष्णाजी ताटे यांनी जागेचा ठराव देवून सुद्धा पत्रकार भवन झाले नाही अशी त्यांची खंत आहे.
सकाळ च्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील १२०० शेतकऱ्यांना कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत गट शेतीचे मोफत प्रशिक्षण दिले तर डॉ. राधिका शहा यांनी सकाळ मधुरांगण, तनिष्का या उपक्रमाच्या माध्यमातून शेकडो युवती, महिलांना सांस्कृतिक, सामाजिक, मनोरंजन, आत्मनिर्भर कामाची मेजवानी दिली.
आरोग्य संदेश बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, कार्याध्यक्ष तुषार रंजनकर, उपाध्यक्ष प्रा. भास्कर गटकुळ, सचिव शिक्षक जमीर शेख, संचालक नामदेव गानबोटे, सुभाष पानसरे, अधिक इंगळे, धरमचंद लोढा, डॉ. राधिका शहा यांनी स्वखर्चाने विविध सामाजिक उपक्रम राबविले. त्यामध्ये सर्वात उल्लेखनीय उपक्रम म्हणजे मराठी हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धा. या स्पर्धेत आतापर्यंत ६५ हजारहून जास्त विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
डॉ. शहा पती पत्नी यांनी आतापर्यंत जोडीने ११ वेळा, डॉ. शहा यांनी ३३ वेळा रक्तदान केले असून डॉ. शहा यांनी आतापर्यंत ३० वेळा रक्तदान शिबिरे घेतली आहेत. त्यांनी ६५० नागरिकांची रक्त गट चाचणी करून इंदापूरात
अडचणीच्या वेळी रक्त उपलब्ध करून दिले.
होमिओपॅथीचा प्रचार करताना त्यांनी महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. बाहुबली शहा, उपाध्यक्ष डॉ. अजित फुंदे, भारती विद्यापीठ होमिओपॅथिक कॉलेज चे प्राचार्य डॉ. अरुण जाधव, सुप्रसिद्ध डॉ. अजित कुलकर्णी, यांच्या समवेत १५० हून जास्त मोफत होमिओपॅथिक शिबिरे घेतली आहेत. डॉ. दीपक जगताप यांच्यासह ११ वेळा चर्चासत्राचे आयोजन केले आहे. विविध वर्तमानपत्र, मासिके यातून लिखाण करून त्यांनी होमिओपॅथीच्या प्रचारासाठी योगदान दिले आहे. युवक मित्र बंडातात्या कऱ्हाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युवापिढीसाठी उन्हाळी सुट्टीत हरिपाठ संस्कार शिबिर मुकुंदशेठ शहा व भरतशेठ शहा, आजरेकर फडाचे विद्यमान प्रमुख हरिभाऊ बोराटे, ह.भ.प श्री. ढगे महाराज, हनुमंत कदम महाराज यांच्या सहकार्याने घेतले. समाज व्यसनमुक्त रहावा यासाठी त्यांनी योगदान दिले आहे. इंदापूर येथे श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर उभारणीत त्यांनी आपले बंधू डॉ. श्रेणिक शहा यांच्या समवेत खारीचा वाटा उचलला आहे. बिजवडी येथे झालेल्या राष्ट्रीय दिगंबर जैन हुंबड समाज मेळाव्यात त्यांनी प्रसिध्दी प्रमुख म्हणून काम केले आहे. इंदापूर येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या जैन अल्प- संख्याक मोर्चा यशस्वी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जीवनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सन्मती सेवा दलाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करताना सोलापूर येथे अल्पसंख्याक मेळावा यशस्वीतेसाठी योगदान दिले. विविध क्षेत्रात त्यांनी उभयतांनी अष्टपैलू, नेत्रदीपक कामगिरी केली आहे. समाज चांगला रहावा यासाठी डॉ. शहा पती पत्नीनी एकमेकास साथ देत अनमोल योगदान दिले आहे. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो, त्यांची स्वप्ने पूर्ण करो ही सदिच्छा. इंदापूर तालुक्याचे भाग्य विधाते खासदार स्वर्गीय शंकरराव पाटील यांचा डॉ. संदेश शहा यांच्या वर विशेष लोभ होता.
टिप्पण्या