मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लक्ष्मी वैभव न्युज,शिवसृष्टी न्युज

  कैकाडी जमातीचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना दिले निवेदन     इंदापूर:-संपूर्ण महाराष्ट्रात कैकाडी जमातीचा अनुसूचित जातीत समावेश करावा- रोहिदास जाधव,महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याकडे संत कैकाडी महाराज कैकाडी समाज एकता मंचाचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रोहिदास जाधव यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.    या निवेदनात असे म्हटले आहे की कैकाडी जमात ही 1950 पासून भारतीय राज्यघटना आर्टिकल 341 खाली अनुसूचित जातीत असल्याने व सध्या ही जात विदर्भात अनुसूचित जातीत असल्याने व उर्वरित महाराष्ट्रात विमुक्त जातीत असल्याने क्षेत्रीय बंधन उठून पूर्ण महाराष्ट्रात तिचा अनुसूचित जातीत समावेश होणेबाबतचे निवेदन दिले आहे.     वेळोवेळी पाठपुरावा करून देखील संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जातीमध्ये समावेश होत नसल्याने राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लक्ष घालून न्याय मिळावा यासाठी कैकाडी समाज एकता मंचाने हर्षवर्धन पाटील यांच्याकडे निवेदन दिले आहे.    केंद्र सरकारच...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

भाऊ बहीण जिव्हाळ्याच्या नात्याचे दृढीकरण या दृष्टीने रक्षाबंधन हा सण साजरा करणे स्वागतार्ह आहे,-डॉ.जयश्री गटकुळ श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा हा सण प्रामुख्याने उत्तर भारतात साजरा केला जातो.नव्या काळात 'एक दांपत्ये-एक अपत्ये' अशी जीवनशैली रूजू लागली जिव्हाळ्याच्या नात्याचे दृढीकरण या दृष्टीने रक्षाबंधन हा सण साजरा करणे स्वागतार्ह आहे, सद्या महाराष्ट्रातही तो मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येऊ लागला आहे.भाऊ आणि बहिण यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याचे दृढीकरण या दृष्टीने रक्षाबंधन हा सण साजरा करणे स्वागतार्ह आहे.    भावाने बहिणीचे प्रेम अखंड राहावे, भावाने बहिणीचे रक्षण करावे, या कर्तव्यभावनेने रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो,    रक्षाबंधन सण साजरा करतांना बहिणीने भावाला जसी राखी बांधावी,तशीच भावाने बहिणीला राखी बांधल्यास विश्वासाचे नाते होईल त्याच पद्धतीने,बहिणीने भावाला ओवाळण्या बरोबरच भावाने बहिणीला ओवाळणे वगैरेसारखे नवे उपक्रम सुरू करणे शक्य आहे.बहिणी बहिणींनी एकमेकींना, मुलीने आपल्या वडिलांना, भावा-भावांने एक...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत तिला रोख एक लाख रुपये मदत-दतात्रय भरणे  इंदापूर:-सुरवड येथील कुमारी कल्याणी तुकाराम माने या इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार राज्यमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांच्या हस्ते करण्यात आला समवेत सौ सारिका मामी भरणे उपस्थित होत्या कल्याणी माने हिने इयत्ता दहावी मध्ये शंभर टक्के गुण मिळवून महाराष्ट्र मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे याप्रसंगी तिची आई सौ स्वाती माने तसेच इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे सुरेश शिंदे सर दत्तात्रय तोरसकर सर बंडू गायकवाड लक्ष्मण कोरटकर तसेच तिचे आजोबा व घरातील सर्व मंडळी उपस्थित होती यादरम्यान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत तिला रोख एक लाख रुपये मदत म्हणून देण्यात आले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने मिळालेले यश हे आहे व तिचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे याप्रसंगी म्हणाले

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

कोवीड चे नियम पाळून इंदापूर शहरात साध्या पद्धतीने मोहरम साजरा ,भरतशेठ शहा यांंच्या हस्ते चादर अर्पण  इंदापूर:-शहरात विविध ठिकाणी मोहरमचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी सवारी व ताबूतची मिरवणूक काढून मोहरम उत्सव साजरा करत, सर्वधर्म समभाव व अनोख्या क्रणानुबंधाचा संदेश दिला. इंदापूर शहरातील शेख मोहल्ला येथे दर्ग्यात इंदापूर नगरपालिकेचे चे नगरसेवक भरतशेठ शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गुडु मोमीन, रमेश धोत्रे, नितीन मखरे, सामजिक कार्यकर्ते जावेद शेख, अल्ताफ पठाण आदी मान्यवरांच्या हस्ते ताबूत ला पवित्र भावनेने फुलांची चादर अर्पण करण्यात आली. या वेळी भरतशेठ  शहा म्हणाले की,इंदापूर शहरातील, मोठ्या उत्सवा मध्ये मोहरम साजरा होतो,सवारी, ताबूत (ताजिया) ची मोठ्या ऊत्सवात बहुजन बांधव एकत्रीत येवून आनंदात साजरी करत असतात. या वर्षी कोरोना ची साथ असल्यामुळे कोवीड चे नियम पाळून साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली, ते म्हणाले की कोरोनाला हरवण्यासाठी.सॅनिटायझर, मास्कचा वापर करा,सुरक्षीत रहा, कोरोणा हरेल आपण जिंकेल, ताजीया ला चादर अर्पण करण्यासाठी भरतश...

लक्ष्मी वैभव न्युज,शिवसृष्टी न्युज

हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप   इंदापूरः-  राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री  हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना तसेच श्रावणबाळ आश्रमातील मुलांना फळांचे वाटप करण्यात आले.      हर्षवर्धन पाटील यांचे सामाजिक कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असते. सामाजिक बांधिलकीतून त्यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटपाचे आयोजन दरवर्षी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या वतीने करण्यात येते. प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ विभागाच्या वतीने आज ग्रामीण रुग्णालय आणि आश्रमामध्ये फळांचे वाटप करण्यात आले.   यावेळी डॉ. संतोष खामकर, विक्रम पोतदार तसेच महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची हर्षवर्धन पाटील यांनी घेतली भेट, विविध विषयांवर केली चर्चा  इंदापूर:          महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.18) मुंबईत राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली व विविध विषयांवरती चर्चा केली. यावेळी निरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील हेही उपस्थित होते.                  या भेटीत राज्यात सध्या सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज खंडित मोहिमेसंदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी राज्यपाल महोदयांशी प्रामुख्याने चर्चा केली. . सध्या  शेतीपंपांची वीज तोडणी मोहीम सुरु असल्याने शेतातील उभी पिके जळून चालली असून जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. शेतकरी बांधव हे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याने सध्याच्या प्राप्त परिस्थितीत ते वीज बिलाचे पैसे भरू शकत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेली  शेतकऱ्यांच्या शेतीपं...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूरात कोरोनाच्या संकटामुळे मोहरम साध्या पध्दतीने साजरा इंदापूर:-चा मोहरम हा सण सुमारे ३५० वर्षापासून पूणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे यामध्ये हिंदू मुस्लीम एकत्र येउन सहभागी होतात परंतू कोरोनाच्या संकटामुळे तो साध्या पध्दतीने साजरा होत आहे .सातपुडा भागातील मानाची शेख फरिदबाबाची सवारी ही पद्माकर (बाळू) राऊत हे घेतात . मोहरमच्या ९ वी या कत्तल कि रात या दिवशी सवारी निघते व गाव प्रदिक्षणा करून भेटीचा कार्यक्रम होतो . यावेळी प्रशासकिय नियम पाळून घरगुती पध्दतीत मोजक्याच लोकांत विधिवत पुजा होऊन साध्या पध्दतीने साजरा झाला . यावेळी प्रविण राऊत ;महादेव चव्हाण सर' सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार उपस्थित होते यावेळी बोलताना हमीदभाईआतार म्हणाले की,.मोहरम' हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. यंदा मोहरम १२ ऑगस्ट पासून सुरू होत आहे. मोहरमपासून हिजरी संवत ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

ज्योती क्रांती को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि. या शाखेचे क्यू आर कोड मल्टीस्टेट चे उद्घाटन -महादेव सोमवंंशी इंदापूर:-दिनांक 18 ऑगस्ट 2021 रोजी इंदापूर शहरामध्ये ज्योती क्रांती को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि. या शाखेचे क्यू आर कोड मल्टीस्टेट चे उद्घाटन शिवसेना इंदापूर शहर प्रमुख तथा इंदापूर तालुका भ्रष्टाचार निर्मूलन कमिटी सदस्य मा.श्री मेजर महादेव सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना प्रणित हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेना सहचिटणीस पश्चिम महाराष्ट्र राज्य मा.श्री राजू शेवाळे इंदापूर तसेच शिवसेना इंदापूर शहर संघटक मा.श्री अवधूत पाटील तसेच शिवसेना इंदापूर उपशहर प्रमुख मा.श्री संजय खंडागळे शिवसेना शाखाप्रमुख मा.श्री बालाजी पाटील तसेच शिवसेना शाखाप्रमुख मा.श्री विकास शिंदे व शिवसैनिक तसेच मान्यवर उपस्थितीत होते

Laxmi vaibhav news, Shivsrusthi news

Akash Pawar, Founder President of Surajya Nirman Sena and Indapur Taluka President of Republican Sena joined the Congress.     Indapur:-  On behalf of the Pune District Congress Party, on the occasion of the 75th Independence Day of the country, a felicitation function was held at Rajgurunagar on Monday 16th to honor the family members of the freedom fighters of Pune district.  Activists from Indapur taluka participated in this program.         Akash Pawar, Founder President of Surajya Nirman Sena Maharashtra, inaugurated the event in the presence of prominent Congress leaders in the district.  Akash Pawar was the taluka vice president of the Rashtriya Samaj Party.  He has contested Panchayat Samiti from Nimgaon Ketki Gana in 2017.  Surajya Nirman Sena has 15 branches in Indapur taluka .He is the son of Kalamb village.       Simultaneously, Yuvraj Tanaji Gaikwad from Pimpri Budruk in Indapur taluka also jo...

Laxmi vaibhav news, Shivsrusthi news

Shivshahi Shetkari Sanghatana needs time  Praveen Mane   Indapur:-Nitin Dada Arde, Founder President of Shivshahi Shetkari Sanghatana, Pune Zilla Parishad Member and Hon.  Construction and Health Chairman Praveen (Bhaiya) Mane paid a courtesy call.  On that occasion, he praised the activities of Shivshahi Shetkari Sanghatana.  He lauded the founding president for setting up a militant organization to solve the problems of the farmers.  Today's farmer is plagued by many problems.  Due to the crisis of Asmani and Sultani, agriculture has lost its livelihood.  The Corona Covid-19 epidemic has devastated agricultural economics.  The farmer is in trouble.  In addition, the power distribution company has cut off the power supply to agriculture.  As a result, the farmers have become helpless.  Shivshahi Shetkari Sanghatana, which is working for the demand of justice of farmers and for the benefit of farmers, will solv...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर शहर प्रभाग क्रमांक १ दत्तनगर ला  रस्त्याच्या कामाचा शुभारंभ -विकास (बापू) खिलारे  इंदापूरः- शहर प्रभाग क्रमांक १ दत्तनगर या  ठिकाणी  रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज दिनांक १७ ऑगस्ट २०२१ रोजी संपन्न झाला. या वेळी प्रभागाचे विद्यमान नगरसेवक तसेच आरोग्य सभापती अनिकेत वाघ माजी नगरसेवक प्रशांत  शिताप माजी नगसेवक,  सुधीर मखरे इंदापूर शहर राष्ट्रवादी वरिष्ठ उपाध्यक्ष महादेवराव  लोखंडे ओबीसी सेलचे शहराध्यक्ष मुकुंद साळुंखे इंदापूर शहर राष्ट्रवादी सामाजिक न्याय शहराध्यक्ष विकास बापु खिलारे श्रीकांत मखरे उमेश मखरे तुकाराम कांबळे तसेच दत्तनगर मधील नागरीक व सुजन नागरी संघर्ष समिती चे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदासजी आठवले  १८ आॅगष्ट २०२१ रोजी इंदापूर तालुक्याच्या दौ-यावर - शिवाजीराव मखरे    इंदापूर :-तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते कि,आपल्या सर्वांचे लाडके नेते केंद्रीय सामाजिक न्याय व विशेष अधिकारता मंत्री मा.ना.डाॅ.रामदासजी आठवले साहेब हे बुधवार दिनांक १८/०८/२०२१ रोजी इंदापूर तालुक्याच्या दौ-यावर येत असून आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावेआशी माहीती शिवाजीराव मखरे यांनी दिली,  ते म्हणाले की,  साहेबांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे:-दुपारी ४:४०वाजता मा.नगराध्यक्ष दिवंगत पॅंन्थर नेते रत्नाकर मखरे(तात्या)यांचे घरी भिमाई आश्रम शाळा येथे सांत्वनपर भेट.त्यानंतर ५:१० वाजता पुणे जिल्हा आरपीआयचे संघटक सचिव शिवाजीराव मखरे यांच्या घरी त्यांचे चिरंजीव हेमंत व आम्रपाली या नुतन वधूवरांना शुभाशिर्वाद देवून, भिगवण येथे ५:३० वाजता एस आर गारमेंट या कापड दुकानाचे उद्घाटन ५:५० पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम शेलार यांचे घरी सांत्वनपर भेट असा साहेबांचा दौरा असून आपण सर्वांनी उपस्थित राहावे आसे...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

लाॅकडाऊन काळात उदय & किरण यांचे कार्य कौतुकास्पद,कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानित -हर्षवर्धन पाटील इंदापूर:-करोना व्हायरसमुळे भारतामध्ये लॉकडाऊन होते संचारबंदीच्या काळात लोकांनी रस्त्यावर अनावश्यक फिरू नये, असे सरकारने सांगितले होते, आणि त्याचे पालनही सुरु होते,. पण ज्या लोकांचे पोट हातावर असते, जे रोजंदारीवर काम करतात त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळे अशा वंचित लोकांसाठी लॉक डाउनच्या काळात सर्व हॉटेल बंद असताना कोविड हॉस्पिटला रुग्णांना जेवणाची उत्तम सोय केल्यामुळे माजी सहकार व संसदीय कामकाज मंत्री यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त हॉटेल देशपांडे व्हेज चे सर्वासर्वे मा.उदयजी देशपांडे व किरण गानबोटे यांना महाराष्ट्र राज्याचे ओबीसी सेलचे अध्यक्ष मा योगेश आण्णा टिळेकर,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब,इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन मा देवराज भाऊ जाधव ओबीसी सेलचे इंदापूर तालुका अध्यक्ष पांडूरंग तात्या शिंदे,व इतर मान्यवरांच्या हस्ते अष्टविनायक कोविड योद्धा म्हणून गैरविण्यात आले,आसल्याची माहीती आयोजकांकडून मिळाली,  उदय देशपां...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर शहरातील कुल्फी व किराणा दुकानाला लागली आग,राजवर्धनदादा पाटील यांच्याकडून पाहणी इंदापूर प्रतिनिधी-     इंदापूर शहरातील साठेनगर परिसरातील प्रसिध्द असणाऱ्या शिंदे मामा कुल्फी कारखान्याला तसेच किराणा दुकानाला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत या कारखान्यात असणारी पिकअप गाडी जळाली असून शेजारीच असणाऱ्या किराणा दुकानासह पिठाची गिरण तसेच सर्व काही आगीत नष्ट झाले आहे. कुल्फी कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळताच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.     नामदेव शिंदे यांचे कुल्फी कारखाना तसेच सचिन लोणकर यांचे किराणा दुकानास आग लागली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी फोनद्वारे माहिती देताच इंदापूर नगरपालिका, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना,  निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक गाड्या आल्या त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.     शिंदे मामा यांचा कुल्फी कारखाना प्रसिद्ध असून आजची घटना ही दुर्देवी आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. नु...

लक्ष्मी वैभव न्युज,शिवसृष्टी न्युज

नीरा-भीमा कारखान्याच्या इथेनॉलचे 1कोटी 8 लाख लि. उत्पादन तरआगामी हंगामात 1कोटी 75 लाख लि.चे उद्दिष्ट-हर्षवर्धन पाटील           इंदापूर:-तालुक्यातील  शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 च्या हंगामात इथेनॉलचे 1 कोटी 8 लाख लि.चे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. तसेच कारखान्याचा  प्रतिदिनी 1 लाख लि. उत्पादन क्षमतेचा इथेनॉलचा नवीन प्रकल्प पुढील वर्षीच्या इथेनॉल हंगामापासून कार्यान्वित होईल. त्यामुळे कारखान्याची इथेनॉलची उत्पादन क्षमता प्रतिदिनी 2 लाख लि. एवढी होणार आहेत. दरम्यान, चालु होणाऱ्या हंगामामध्ये कारखान्याने 1कोटी 75 लाख लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.16) दिली.            शहाजीनगर येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020-21 च्या इथेनॉल  हंगामाची सांगता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इथेनॉलचे पूजनाने आज करण्यात आली. सदर प्रसंगी मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते. ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

नीरा भीमा कारखान्यावरती स्वातंत्र्य दिन उत्साहात इंदापूर:          शहाजीनगर येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती देशाचा अमृतमहोत्सवी 75 वा स्वातंत्र्य दिन रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.                 देशाला स्वातंत्र्य मिळालेनंतर गेल्या 74 वर्षामध्ये देशाने सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक अशी प्रगती केली आहे. सहकारामुळे देशाच्या ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नीरा भीमा कारखान्याची स्थापना केल्यामुळे या परिसराचे नंदनवन झाले आहे. राज्यातील साखर उद्योग सध्या काहीसा अडचणीत असला तरी येत्या काळात अडचणी निश्चितपणे दूर होतील, असा विश्वास यावेळी भाषणात लालासाहेब पवार व कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासराव वाघमोडे यांनी व्यक्त केला.           प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. एन. मरकड यांनी केले. ध्वजारोहण प्रसंगी कारखान...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

माझी वसुंधरा" अभियानांतर्गत सूर्योदय परिवार,जय हिंद माजी सैनिक संघटना, यांच्यावतीने इंदापूर एसटी स्टँड वर वृक्षारोपण -अंकिता मुकुंदशेठ शहा इंदापूर:-भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त शासनाच्या "माझी वसुंधरा" अभियानांतर्गत सूर्योदय परिवार जय हिंद माजी सैनिक संघटना इंदापूर तालुका, साई मंदिर यांच्यावतीने इंदापूर एसटी बस स्थानक येथे वृक्ष लावण्यासाठी लागणाऱ्या कुंड्या व वृक्ष यांचे पूजन कर्तव्य दक्ष नगराध्यक्षा, सौ.अंकिता मुकुंदशेठ शहा, मुख्याधिकारी श्री.रामराजे कापरे,  व इंदापूर एसटी आगार प्रमुख  मणियार. व माजी सैनिक यांच्या शुभहस्ते कुंड्या व वृक्षांचे पूजन करण्यात आले, एसटी बस प्लॅटफॉर्मवर कुंड्या  देऊन, साई मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला त्यासाठी प्रमुख उपस्थिती सर्व इंदापूर नगरपालिका पदाधिकारी व सर्व कर्मचारी सेवक स्टाफ एसटी पदाधिकारी व कामगार स्टॉप तसेच जय हिंद माजी सैनिक संघटना  चे माजी सैनिक मेजर कैलास गवळी,  मेजर रविराज पवार, मेजर  मनोज बारटक्के, मेजर  हरिश्चंद्र...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

अटल घन वनातील वृक्षांचा दुसरा वाढदिवस जल्लोषात साजरा-सौ.अंकिता शहा   इंदापूर:-महाराष्ट्र शासनाच्या अटल आनंद घनवन योजनेअंतर्गत भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इंदापूर नगर परिषदेच्या वतीने 15 ऑगस्ट 2019 रोजी भार्गवराम बगीच्या शेजारील टाऊन हॉल पाठीमागे  22 गुंठे जागेमध्ये जवळपास दोन हजार विविध प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड एकाच दिवशी केली होती त्याप्रसंगी शहरातील सर्व शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक विद्यार्थी कर्मचारी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी शहरातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच इंदापूर नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांनी सदर वृक्षारोपण केले होते आज या गोष्टीला दोन वर्षे पूर्ण होत आहे त्यामुळे इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने कर्मचाऱ्यांनी या अटल घन वनातील वृक्षांचा दुसरा वाढदिवस नगराध्यक्ष सौ. अंकिता मुकुंद शहा व मुख्याधिकारी, श्री.रामराजे कापरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाडांना हारफुले, फुगे, चमकीचे कागद बांधून सजावट केल्यानंतर मोठ्या जल्लोषात केक कापून झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी इंदापूर ता...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.अंकिता मुकुंद शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण  इंदापूर:- भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज इंदापूर नगर परिषद कार्यालयासमोरील प्रांगणात इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.अंकिता मुकुंद शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी श्री नारायणदास रामदास हायस्कूल चे शिक्षक श्री दादासाहेब जावीर, यशवंतराव केवारे, तानाजी गलांडे व ओंकार जौंजाळ या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत सादर केले.  तद्नंतर महाराष्ट्र शासनाच्या माजी वसुंधरा अभियानांतर्गत सर्व  मान्यवरांना वसुंधरेची शपथ नगरपरिषदेचे कर्मचारी श्री अल्ताफ पठाण यांनी वाचन करून दिली. बँड पथकातील विद्यार्थ्यांनी ध्वज गीत सादर केले नंतर सर्वांना नगर परिषदेच्या कार्यालयात चहापानी करण्यात आले. यावेळी इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा.श्री. रामराजे कापरे, नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी ,अधिकारी कर्मचारी, शहरातील विविध राजकीय पक्षांचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर या ध्वजारोहण समा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

भारतीय लोकशाही वृद्धिंगत- हर्षवर्धन पाटील    हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण  इंदापूर:-     इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारताला स्वातंत्र्यानंतर 74 वर्षात आपल्याला काय मिळाले याचे आपण अवलोकन केले तर आपण लोकशाही मिळवली. जगाला भारतीय लोकशाही बद्दल हेवा वाटतो एवढे कर्तुत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेचा आधार ठेवून अनेक पिढ्या, अनेक पक्ष, अनेक नेते या 74 वर्षात पुढे आले. अनेक सरकार आले अनेक सरकार गेली परंतु आपल्या लोकशाहीचा आराखडा( ढाचा )अबाधित राहिला आहे हे मोठे योगदान आपल्याला मिळाले असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.    हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' आज आपण आपल्या भारत देशाचा 75 अर्थात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. हा एक राष्ट्रीय सण म्हणून आपण सर्वजण उत्साहात साजरा करीत असतो. यानिमित्ताने मी आपणास ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुका विधानसभा मतदार संघातील पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातील अनेकांचा शिवसेनेत प्रवेश-नितीन शिंदे  इंदापूर:-दिनांक 12 ऑगस्ट 2021 इंदापूर तालुका विधानसभा मतदार संघातील पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातील  गटातील खालील अनेक नव युवकांनी पळसदेव या गावी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला ते पुढील प्रमाणे  1) श्री युवराज सुभाष नगरे 2) श्री सूर्यकांत संभाजी चव्हाण 3) श्री प्रवीण प्रकाश गायकवाड 4 श्री आकाश शितल नगरी 5) सचिन मानसिंग चमरे 6) श्री बाळा सोमनाथ नगरी 7) श्री आकाश नामदेव पवार 8) श्री सचिन गजानन काणे 9) श्री सुनील आकाश काणे 10) श्री प्रकाश बाळासाहेब जाधव 11) श्री विजय बिभीषण चमरे 12) श्री अमन संजय काने 13) श्री अमोल अनिल मोरे 14) श्री शरद (तात्या) जाधव  15) श्री अक्षय काने 16) श्री कपिल रूपचंद माने 17) श्री रोहित आबासाहेब बाडे 18) श्री रवि केवडे  19) श्री विनोद माने 20) श्री ईश्वर काणे 21) श्री अक्षय बिभीषण चमरे यावेळी जिल्हा समन्वयक मा श्री विशाल दादा बोंद्रे इंदापूर तालुकाप्रमुख मा श्री नितीन शिंदे शिवसेना इंदापूर शहर प्रमुख तथा इ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम त्वरीत थांबवा - हर्षवर्धन पाटील, इंदापूर:               शेतकरी बांधव हे अजूनही  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. तसेच सध्या शेतकऱ्याकडे पैसे उपलब्ध होतील असे कोणतेही पीक शेतात  नसल्याने शेतकरी हा लगेच वीज बिलाचे पैसे भरू शकत नाही. त्यामुळे महावितरणने शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज तोडणी मोहीम त्वरित थांबवावी, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.12) केली.               इंदापूर तालुक्यामध्ये महावितरणने वीज तोडणी मोहीम सुरू केली आहे. काल बुधवारी निमगाव केतकी, गोतंडी, अजोती, पडस्थळ आदी अनेक गावांच्या परिसरात डीपी सोडवून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करणेचे काम सुरू केले आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी  आज गुरुवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यावा,  अशी मागणी केली.                  यासंदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी एमएसईबीच्या अधिका...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्यूज

वसीम शेख यांच्या एस.एस.ट्रेडर्स दुकानाचे उद्घाटन भरतशेठ शहा यांच्या हस्ते थाटात संपन्न इंदापूर:-   सद्यस्थितीत देशात कोरोना मुळे, मंदिची लाट असून बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून आजच्या पिढीने उद्योगाकडे वळण्याची गरज आहे , सध्याच्या काळात नोकरी मिळणे कठीण झालेले असुन युवकांनी नोकरीच्या शोधात न राहता व्यवसायाकडे वळावे, असे प्रतिपादन इंदापूर अर्बन बँकेचे मा.चेअरमन भरतशेठ शहा यांनी एस.एस.ट्रेडर्स पानमटेरीयल होलसेल दुकानाच्या उदघाटन प्रसंगी भरतशेठ शहा यांनी केले, या वेळी बी.एम.पी.चे राष्ट्रीय महासचिव अॅड राहूल मखरे, कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र दादा रेडके, तेजप्रुथ्वी ग्रुप महाराष्ट्र राज्याचे मार्गदर्शक नानासाहेब खरात दुकानमालक वसीम शेख, आझाद पटेल,सुरज धाईंजे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, 

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शेततळ्यात अज्ञातांनी टाकलेल्या विषारी औषधामुळे पाच टन मासे मृत्युमुखी हा प्रकार धक्कादायक- संजय सोनवणे  इंदापूर:- तालुक्यातील पळसदेव च्या शेलारपट्टा येथील शेतकरी संजय एकनाथ शेलार यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय  सोनवणे यांनी भेट घेऊन दिलासा दिला. संजय शेलार यांच्या शेततळ्यात अज्ञातांनी टाकलेल्या विषारी औषधामुळे सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडले. हा प्रकार धक्कादायक असल्याचे संजय सोनवणे यांनी भेटीप्रसंगी सांगितले.  शेलार यांचे शेलार पट्टा भागात शेततळे आहे. या शेततळ्यात आठ महिन्यांपूर्वी त्यांनी रूपचंद जातीचे ३० हजार बीज सोडले होते.  मात्र कोणीतरी विषारी औषध टाकल्याने मासे मृत्युमुखी पडले.सोमवारी सकाळी माशांना खाद्य देण्यास गेल्यानंतर सदरचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या भेटीच्या वेळी  संजय सोनवणे यांनी शेततळ्याची पाहणी केली तसेच शेतकरी शेलार यांचेशी चर्चा केली, दुरध्वनीवरुन झालेला प्रकार इंदापुर पोलीस स्टेशनचे पी आय(pi) धन्यकुमार गोडसे यांना सांगण्यात आला,व लवकरात लवकर आरोपी शोधुन त्याच्यावर कठोर कारवाई करण...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शेतकऱ्याचे पाच टन मासे मृत्युमुखी ही बाब धक्कादायक, पळसदेवच्या त्या शेतकऱ्याला दिला,सामान्यांचा नेता राजवर्धन पाटील यांनी दिलासा         इंदापूर:       पळसदेव च्या शेलारपट्टा येथील शेतकरी संजय एकनाथ शेलार यांची निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धनदादा पाटील यांनी मंगळवारी (दि.10) भेट घेऊन दिलासा दिला. संजय शेलार यांच्या शेततळ्यात अज्ञातांनी टाकलेल्या विषारी औषधामुळे सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडले. हा प्रकार धक्कादायक असल्याचे राजवर्धनदादा पाटील यांनी भेटीप्रसंगी सांगितले.        संजय शेलार यांचे शेलार पट्टा भागात शेततळे आहे. या शेततळ्यात आठ महिन्यांपूर्वी त्यांनी रूपचंद जातीचे ३० हजार बीज सोडले होते.  मात्र कोणीतरी विषारी औषध टाकल्याने  मासे मृत्युमुखी पडले. आज सोमवारी सकाळी माशांना खाद्य देण्यास गेल्यानंतर सदरचा प्रकार समोर आला. या भेटीच्या वेळी जनसामन्यांचे नेते, राजवर्धनदादा पाटील यांनी शेततळ्याची पाहणी केली तसेच शेतकरी संजय शेलार यांचेशी चर्चा केली व दिलासा दिला...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

राजवर्धन पाटील यांच्यात दिसले साधेपणाची दर्शन, यांच्या सर्वसामान्य कृतीमुळे कारागिर व दुकान मालकाला बसला सुखद धक्का    इंदापूर - आज एका दुकानाच्या उदघाटन प्रसंगी निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील हे इंदापूर शहरात आले होते. यावेळी दुकानाचे उदघाटन संपन्न झाल्यानंतर तिथेच बाजूला असलेल्या बापूराव दळवी यांच्या पायल मेन्स पार्लर या दुकानाला राजवर्धन पाटील यांनी भेट दिली व त्यांनी तेथे सलून  व्यावसायिकांकडून दाढी-कटिंग करून घेतली.राजकीय नेता म्हटले की बडेजाव, तामझाम आलाच पण सर्व सामान्य नागरिकाप्रमाणे राजवर्धन पाटील यांनी कारागीर व मालकाशी संवाद साधत त्यांच्याकडून दाढी कटिंग करून घेतल्याचा साधेपणा सर्वांच्या निदर्शनास आला आणि त्यांच्या या कृतीमुळे त्यांना एक सुखद असा अनुभव पाहावयास मिळाला.    कोरोनाच्या काळात सलून व्यवसायावर मोठी आपत्ती आली होती. उदरनिर्वाहाचे प्रमुख साधनच बंद असल्याकारणाने त्यांच्यावर अनेक संकटे आली. आता सलून व्यवसाय करण्यास शासनाने परवानगी दिल्याने काही प्रश्न सुटण्यास मदत झाली ...