इंदापूरः-
राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना तसेच श्रावणबाळ आश्रमातील मुलांना फळांचे वाटप करण्यात आले.
हर्षवर्धन पाटील यांचे सामाजिक कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असते. सामाजिक बांधिलकीतून त्यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटपाचे आयोजन दरवर्षी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या वतीने करण्यात येते. प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ विभागाच्या वतीने आज ग्रामीण रुग्णालय आणि आश्रमामध्ये फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ. संतोष खामकर, विक्रम पोतदार तसेच महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.
टिप्पण्या