कोवीड चे नियम पाळून इंदापूर शहरात साध्या पद्धतीने मोहरम साजरा,भरतशेठ शहा यांंच्या हस्ते चादर अर्पण
इंदापूर:-शहरात विविध ठिकाणी मोहरमचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी सवारी व ताबूतची मिरवणूक काढून मोहरम उत्सव साजरा करत, सर्वधर्म समभाव व अनोख्या क्रणानुबंधाचा संदेश दिला.
इंदापूर शहरातील शेख मोहल्ला येथे दर्ग्यात इंदापूर नगरपालिकेचे चे नगरसेवक भरतशेठ शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गुडु मोमीन, रमेश धोत्रे, नितीन मखरे, सामजिक कार्यकर्ते जावेद शेख, अल्ताफ पठाण आदी मान्यवरांच्या हस्ते ताबूत ला पवित्र भावनेने फुलांची चादर अर्पण करण्यात आली.
या वेळी भरतशेठ शहा म्हणाले की,इंदापूर शहरातील, मोठ्या उत्सवा मध्ये मोहरम साजरा होतो,सवारी, ताबूत (ताजिया) ची मोठ्या ऊत्सवात बहुजन बांधव एकत्रीत येवून आनंदात साजरी करत असतात. या वर्षी कोरोना ची साथ असल्यामुळे कोवीड चे नियम पाळून साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली, ते म्हणाले की कोरोनाला हरवण्यासाठी.सॅनिटायझर, मास्कचा वापर करा,सुरक्षीत रहा, कोरोणा हरेल आपण जिंकेल, ताजीया ला चादर अर्पण करण्यासाठी भरतशेठ शहा उपस्थित होते त्या वेळी बोलत होते,
मोहरमच्या सणानिमित्ताने इंदापूर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलिसांचा मोठा बंदोबस्त इंदापूर शहरातील दर्गा मस्जिद चौक, ठाकरगल्ली, राजेवलीनगर, खडकपुरा तसेच इतर संवेदनशील ठिकाणी चोख लावण्यात आला होता. त्यामुळे शांततेत सर्वत्र सण साजरा करण्यात आला.
बहूजन मुक्ती पार्टीच्या वतीने राष्ट्रीय महामचिव अँड. राहल मखरे यांच्या वतीने ताबूत मनोभावे फुलांची चादर अर्पण करण्यात आली. यावेळी माजो नगराध्यक्ष गणेश महाजन, अकील शेख, वसीम शेख, अफसर शेख, संतोष जाधव, नागेश भोसले, रोहित ढावरे, जावेद मुंडे, अफसर झारी, सोहेल शेख, सलमान शेख, जुनेद शेख, फैजान शेख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या