इंदापूर:-सुरवड येथील कुमारी कल्याणी तुकाराम माने या इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार राज्यमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांच्या हस्ते करण्यात आला समवेत सौ सारिका मामी भरणे उपस्थित होत्या कल्याणी माने हिने इयत्ता दहावी मध्ये शंभर टक्के गुण मिळवून महाराष्ट्र मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे याप्रसंगी तिची आई सौ स्वाती माने तसेच इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे सुरेश शिंदे सर दत्तात्रय तोरसकर सर बंडू गायकवाड लक्ष्मण कोरटकर तसेच तिचे आजोबा व घरातील सर्व मंडळी उपस्थित होती यादरम्यान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत तिला रोख एक लाख रुपये मदत म्हणून देण्यात आले
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने मिळालेले यश हे आहे व तिचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे याप्रसंगी म्हणाले
टिप्पण्या