इंदापूर -
आज एका दुकानाच्या उदघाटन प्रसंगी निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील हे इंदापूर शहरात आले होते. यावेळी दुकानाचे उदघाटन संपन्न झाल्यानंतर तिथेच बाजूला असलेल्या बापूराव दळवी यांच्या पायल मेन्स पार्लर या दुकानाला राजवर्धन पाटील यांनी भेट दिली व त्यांनी तेथे सलून
व्यावसायिकांकडून दाढी-कटिंग करून घेतली.राजकीय नेता म्हटले की बडेजाव, तामझाम आलाच पण सर्व सामान्य नागरिकाप्रमाणे राजवर्धन पाटील यांनी कारागीर व मालकाशी संवाद साधत त्यांच्याकडून दाढी कटिंग करून घेतल्याचा साधेपणा सर्वांच्या निदर्शनास आला आणि त्यांच्या या कृतीमुळे त्यांना एक सुखद असा अनुभव पाहावयास मिळाला.
कोरोनाच्या काळात सलून व्यवसायावर मोठी आपत्ती आली होती. उदरनिर्वाहाचे प्रमुख साधनच बंद असल्याकारणाने त्यांच्यावर अनेक संकटे आली. आता सलून व्यवसाय करण्यास शासनाने परवानगी दिल्याने काही प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.मात्र काही प्रश्न तसेच आहेत. नाभिक समाजाच्या अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत हे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत अशी अपेक्षा यावेळी कारागीरबंधूंनी राजवर्धन पाटील यांच्याकडे केली. या पार्श्वभूमीवर आज राजवर्धन पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे व्यवसायामध्ये येऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
टिप्पण्या