श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा हा सण प्रामुख्याने उत्तर भारतात साजरा केला जातो.नव्या काळात 'एक दांपत्ये-एक अपत्ये' अशी जीवनशैली रूजू लागली जिव्हाळ्याच्या नात्याचे दृढीकरण या दृष्टीने रक्षाबंधन हा सण साजरा करणे स्वागतार्ह आहे,
सद्या महाराष्ट्रातही तो मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येऊ लागला आहे.भाऊ आणि बहिण यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याचे दृढीकरण या दृष्टीने रक्षाबंधन हा सण साजरा करणे स्वागतार्ह आहे.
भावाने बहिणीचे प्रेम अखंड राहावे, भावाने बहिणीचे रक्षण करावे, या कर्तव्यभावनेने रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो,
रक्षाबंधन सण साजरा करतांना बहिणीने भावाला जसी राखी बांधावी,तशीच भावाने बहिणीला राखी बांधल्यास विश्वासाचे नाते होईल त्याच पद्धतीने,बहिणीने भावाला ओवाळण्या बरोबरच भावाने बहिणीला ओवाळणे वगैरेसारखे नवे उपक्रम सुरू करणे शक्य आहे.बहिणी बहिणींनी एकमेकींना, मुलीने आपल्या वडिलांना, भावा-भावांने एकमेकांना राखी बांधण्याचा उपक्रमही करता येईल.शिवाय नव्या काळात 'एक दांपत्ये-एक अपत्ये' अशी जीवनशैली रूजू लागली असल्यामुळे अनेकांना सख्खा भाऊ वा सख्खी बहीण असणार नाही.त्यामुळे चुलत,मावस इ.नात्याने भाऊ-बहीण असलेल्या व्यक्तींनी जिव्हाळ्याचे नात्याने सण साजरा करावा.
सौ.डाॅ.प्रा.जयश्री गटकुळ
अध्यक्षा विश्व प्रतिष्ठान
टिप्पण्या