लाॅकडाऊन काळात उदय & किरण यांचे कार्य कौतुकास्पद,कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानित -हर्षवर्धन पाटील
इंदापूर:-करोना व्हायरसमुळे भारतामध्ये लॉकडाऊन होते संचारबंदीच्या काळात लोकांनी रस्त्यावर अनावश्यक फिरू नये, असे सरकारने सांगितले होते, आणि त्याचे पालनही सुरु होते,. पण ज्या लोकांचे पोट हातावर असते, जे रोजंदारीवर काम करतात त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळे अशा वंचित लोकांसाठी लॉक डाउनच्या काळात सर्व हॉटेल बंद असताना कोविड हॉस्पिटला रुग्णांना जेवणाची उत्तम सोय केल्यामुळे माजी सहकार व संसदीय कामकाज मंत्री यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त हॉटेल देशपांडे व्हेज चे सर्वासर्वे मा.उदयजी देशपांडे व किरण गानबोटे यांना महाराष्ट्र राज्याचे ओबीसी सेलचे अध्यक्ष मा योगेश आण्णा टिळेकर,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब,इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन मा देवराज भाऊ जाधव ओबीसी सेलचे इंदापूर तालुका अध्यक्ष पांडूरंग तात्या शिंदे,व इतर मान्यवरांच्या हस्ते अष्टविनायक कोविड योद्धा म्हणून गैरविण्यात आले,आसल्याची माहीती आयोजकांकडून मिळाली,
उदय देशपांडे व किरण गानबोटे यांना कोरोना योध्दा पुरस्कार देण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कोविड सेंटरला मागेल त्याला जेवण देशपांडे व्हेज वरून पुरविण्यात येत होते,कोणताही माणूस जवळ येत नसतानाही जीवावर उदार होऊन होऊन कोविड सेंटरला जेवण देणे म्हणजे फारच तर जिकरीचे काम होते परंतु देशपांडे व्हेज येथील उदयशेठ देशपांडे व किरणशेठ गानबोटे यांनी जेवणाच्या माध्यमातून गोरगरिबांना चांगलीच मदत केली त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले,आसल्याची सर्वत्र चर्चा आहे
टिप्पण्या