इंदापूर:
पळसदेव च्या शेलारपट्टा येथील शेतकरी संजय एकनाथ शेलार यांची निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धनदादा पाटील यांनी मंगळवारी (दि.10) भेट घेऊन दिलासा दिला. संजय शेलार यांच्या शेततळ्यात अज्ञातांनी टाकलेल्या विषारी औषधामुळे सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडले. हा प्रकार धक्कादायक असल्याचे राजवर्धनदादा पाटील यांनी भेटीप्रसंगी सांगितले.
संजय शेलार यांचे शेलार पट्टा भागात शेततळे आहे. या शेततळ्यात आठ महिन्यांपूर्वी त्यांनी रूपचंद जातीचे ३० हजार बीज सोडले होते.
मात्र कोणीतरी विषारी औषध टाकल्याने मासे मृत्युमुखी पडले. आज सोमवारी सकाळी माशांना खाद्य देण्यास गेल्यानंतर सदरचा प्रकार समोर आला. या भेटीच्या वेळी जनसामन्यांचे नेते, राजवर्धनदादा पाटील यांनी शेततळ्याची पाहणी केली तसेच शेतकरी संजय शेलार यांचेशी चर्चा केली व दिलासा दिला.
__________________________
टिप्पण्या