माझी वसुंधरा" अभियानांतर्गत सूर्योदय परिवार,जय हिंद माजी सैनिक संघटना, यांच्यावतीने इंदापूर एसटी स्टँड वर वृक्षारोपण -अंकिता मुकुंदशेठ शहा
इंदापूर:-भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त शासनाच्या "माझी वसुंधरा" अभियानांतर्गत सूर्योदय परिवार जय हिंद माजी सैनिक संघटना इंदापूर तालुका, साई मंदिर यांच्यावतीने इंदापूर एसटी बस स्थानक येथे वृक्ष लावण्यासाठी लागणाऱ्या कुंड्या व वृक्ष यांचे पूजन कर्तव्य दक्ष नगराध्यक्षा, सौ.अंकिता मुकुंदशेठ शहा, मुख्याधिकारी श्री.रामराजे कापरे, व इंदापूर एसटी आगार प्रमुख
मणियार. व माजी सैनिक यांच्या शुभहस्ते कुंड्या व वृक्षांचे पूजन करण्यात आले, एसटी बस प्लॅटफॉर्मवर कुंड्या देऊन, साई मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला त्यासाठी प्रमुख उपस्थिती सर्व इंदापूर नगरपालिका पदाधिकारी व सर्व कर्मचारी सेवक स्टाफ एसटी पदाधिकारी व कामगार स्टॉप तसेच जय हिंद माजी सैनिक संघटना चे माजी सैनिक मेजर कैलास गवळी, मेजर रविराज पवार, मेजर मनोज बारटक्के, मेजर हरिश्चंद्र घोडके, मेजर राजाराम गलांडे, मेजर कृष्णा बोराटे, मेजर अनिल माने, मेजर शिवाजी तळेकर, मेजर विजय माने या सर्वांच्या उपस्थितीत वृक्षारोपण पार पडला
त्यानंतर सर्व मान्यवरांचे आभार व सन्मान प्रदीप आण्णा पवार, हमीदभाई आतार , राजेंद्र हजारे (नेहमीच साई मंदिर परिसरात सामाजिक कामात आग्रेसर आसणारे)यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमासाठी लागणारे वृक्ष हे शहा नर्सरी यांच्या वतीने श्री.मुकुंदशेठ शहा यांनी सहकार्य गेले त्याबद्दल त्यांचेही सूर्योदय परिवार,जय हिंद माजी सैनिक संघटना व साई भक्त परिवार यांच्यावतीने आभार मानण्यात आले.
टिप्पण्या