इंदापूर:- तालुक्यातील पळसदेव च्या शेलारपट्टा येथील शेतकरी संजय एकनाथ शेलार यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी भेट घेऊन दिलासा दिला. संजय शेलार यांच्या शेततळ्यात अज्ञातांनी टाकलेल्या विषारी औषधामुळे सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडले. हा प्रकार धक्कादायक असल्याचे संजय सोनवणे यांनी भेटीप्रसंगी सांगितले.
शेलार यांचे शेलार पट्टा भागात शेततळे आहे. या शेततळ्यात आठ महिन्यांपूर्वी त्यांनी रूपचंद जातीचे ३० हजार बीज सोडले होते.
मात्र कोणीतरी विषारी औषध टाकल्याने मासे मृत्युमुखी पडले.सोमवारी सकाळी माशांना खाद्य देण्यास गेल्यानंतर सदरचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या भेटीच्या वेळी संजय सोनवणे यांनी शेततळ्याची पाहणी केली तसेच शेतकरी शेलार यांचेशी चर्चा केली, दुरध्वनीवरुन झालेला प्रकार इंदापुर पोलीस स्टेशनचे पी आय(pi) धन्यकुमार गोडसे यांना सांगण्यात आला,व लवकरात लवकर आरोपी शोधुन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगीतले. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना देखील मत्स्यव्यवसाय विभागाकडून मदत करण्याची विनंती केली.आशी माहिती संजय सोनवणे यांनी दिली.
टिप्पण्या