इंदापूर:
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.18) मुंबईत राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली व विविध विषयांवरती चर्चा केली. यावेळी निरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील हेही उपस्थित होते.
या भेटीत राज्यात सध्या सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज खंडित मोहिमेसंदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी राज्यपाल महोदयांशी प्रामुख्याने चर्चा केली.
. सध्या शेतीपंपांची वीज तोडणी मोहीम सुरु असल्याने शेतातील उभी पिके जळून चालली असून जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शेतकरी बांधव हे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याने सध्याच्या प्राप्त परिस्थितीत ते वीज बिलाचे पैसे भरू शकत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेली शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज खंडित मोहिम ही तात्काळ थांबविणेसंदर्भात आपण लक्ष घालावे, अशी विनंती भेटीत हर्षवर्धन पाटील यांनी केली.
तसेच राज्यात वाढलेल्या गुणांमुळे सध्या इयत्ता अकरावी व प्रथम वर्ष पदवीचा प्रवेश प्रश्न जटील बनल्याने विद्यार्थी चिंतेत आहे. त्यामुळे
प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुनिश्चित धोरण ठरवून एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासह इतर विषयांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेशी हर्षवर्धन पाटील यांनी चर्चा केली. या सर्व विषयात लक्ष घालू असे राज्यपाल महोदयांनी चर्चेदरम्यान नमूद केले. याभेटीत हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांना भगतसिंह कोश्यारी यांना देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
____________________________
टिप्पण्या