इंदापूरात कोरोनाच्या संकटामुळे मोहरम साध्या पध्दतीने साजरा
इंदापूर:-चा मोहरम हा सण सुमारे ३५० वर्षापासून पूणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे यामध्ये हिंदू मुस्लीम एकत्र येउन सहभागी होतात परंतू कोरोनाच्या संकटामुळे तो साध्या पध्दतीने साजरा होत आहे .सातपुडा भागातील मानाची शेख फरिदबाबाची सवारी ही पद्माकर (बाळू) राऊत हे घेतात . मोहरमच्या ९ वी या कत्तल कि रात या दिवशी सवारी निघते व गाव प्रदिक्षणा करून भेटीचा कार्यक्रम होतो . यावेळी प्रशासकिय नियम पाळून घरगुती पध्दतीत मोजक्याच लोकांत विधिवत पुजा होऊन साध्या पध्दतीने साजरा झाला . यावेळी प्रविण राऊत ;महादेव चव्हाण सर' सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार उपस्थित होते यावेळी बोलताना हमीदभाईआतार म्हणाले की,.मोहरम' हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. यंदा मोहरम १२ ऑगस्ट पासून सुरू होत आहे. मोहरमपासून हिजरी संवत सुरू होते. हिजरी संवतचा हा पहिला महिना असतो.आशी माहीती हमीदभाई आतार यांनी दिली.
टिप्पण्या