इंदापूर प्रतिनिधी-
इंदापूर शहरातील साठेनगर परिसरातील प्रसिध्द
असणाऱ्या शिंदे मामा कुल्फी कारखान्याला तसेच किराणा दुकानाला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत या कारखान्यात असणारी पिकअप गाडी जळाली असून शेजारीच असणाऱ्या किराणा दुकानासह पिठाची गिरण तसेच सर्व काही आगीत नष्ट झाले आहे. कुल्फी कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळताच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
नामदेव शिंदे यांचे कुल्फी कारखाना तसेच सचिन लोणकर यांचे किराणा दुकानास आग लागली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी फोनद्वारे माहिती देताच इंदापूर नगरपालिका, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक गाड्या आल्या त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.
शिंदे मामा यांचा कुल्फी कारखाना प्रसिद्ध असून आजची घटना ही दुर्देवी आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईसाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे राजवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.
टिप्पण्या