वसीम शेख यांच्या एस.एस.ट्रेडर्स दुकानाचे उद्घाटन भरतशेठ शहा यांच्या हस्ते थाटात संपन्न
इंदापूर:- सद्यस्थितीत देशात कोरोना मुळे, मंदिची लाट असून बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून आजच्या पिढीने उद्योगाकडे वळण्याची गरज आहे,सध्याच्या काळात नोकरी मिळणे कठीण झालेले असुन युवकांनी नोकरीच्या शोधात न राहता व्यवसायाकडे वळावे, असे प्रतिपादन इंदापूर अर्बन बँकेचे मा.चेअरमन भरतशेठ शहा यांनी एस.एस.ट्रेडर्स पानमटेरीयल होलसेल दुकानाच्या उदघाटन प्रसंगी भरतशेठ शहा यांनी केले, या वेळी बी.एम.पी.चे राष्ट्रीय महासचिव अॅड राहूल मखरे, कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र दादा रेडके, तेजप्रुथ्वी ग्रुप महाराष्ट्र राज्याचे मार्गदर्शक नानासाहेब खरात दुकानमालक वसीम शेख, आझाद पटेल,सुरज धाईंजे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते,
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या