इंदापूर:-संपूर्ण महाराष्ट्रात कैकाडी जमातीचा अनुसूचित जातीत समावेश करावा- रोहिदास जाधव,महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याकडे संत कैकाडी महाराज कैकाडी समाज एकता मंचाचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रोहिदास जाधव यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की कैकाडी जमात ही 1950 पासून भारतीय राज्यघटना आर्टिकल 341 खाली अनुसूचित जातीत असल्याने व सध्या ही जात विदर्भात अनुसूचित जातीत असल्याने व उर्वरित महाराष्ट्रात विमुक्त जातीत असल्याने क्षेत्रीय बंधन उठून पूर्ण महाराष्ट्रात तिचा अनुसूचित जातीत समावेश होणेबाबतचे निवेदन दिले आहे.
वेळोवेळी पाठपुरावा करून देखील संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जातीमध्ये समावेश होत नसल्याने राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लक्ष घालून न्याय मिळावा यासाठी कैकाडी समाज एकता मंचाने हर्षवर्धन पाटील यांच्याकडे निवेदन दिले आहे.
केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे योग्य तो पाठपुरावा करून, निवेदन देवून न्याय मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या