इंदापूर:-महाराष्ट्र शासनाच्या अटल आनंद घनवन योजनेअंतर्गत भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इंदापूर नगर परिषदेच्या वतीने 15 ऑगस्ट 2019 रोजी भार्गवराम बगीच्या शेजारील टाऊन हॉल पाठीमागे 22 गुंठे जागेमध्ये जवळपास दोन हजार विविध प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड एकाच दिवशी केली होती त्याप्रसंगी शहरातील सर्व शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक विद्यार्थी कर्मचारी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी शहरातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच इंदापूर नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांनी सदर वृक्षारोपण केले होते आज या गोष्टीला दोन वर्षे पूर्ण होत आहे त्यामुळे इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने कर्मचाऱ्यांनी या अटल घन वनातील वृक्षांचा दुसरा वाढदिवस नगराध्यक्ष सौ. अंकिता मुकुंद शहा व मुख्याधिकारी, श्री.रामराजे कापरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाडांना हारफुले, फुगे, चमकीचे कागद बांधून सजावट केल्यानंतर मोठ्या जल्लोषात केक कापून झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या वेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंदशेठ शहा, नगरसेवक श्री.भरत शेठ शहा सामाजिक कार्यकर्ते जावेद भाई शेख रमेश धोत्रे व माजी सैनिक, नगरपरिषदेचे सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते वाढदिवस साजरा केल्यानंतर उपस्थित सर्व माजी सैनिकांचा नगराध्यक्ष माननीय सौ अंकिता शहा मुख्याधिकारी रामराजे कापरे श्री भरत शेठ शहा श्री मुकुंद शेठ शहा यांच्या शुभहस्ते भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सत्कार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर अल्ताफ पठाण यांनी वृक्ष जोपासण्याची प्रतिज्ञा दिली आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
टिप्पण्या