मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

इंदापूर नगरपरिषदेचा कोणताही करवाढ नसलेला व नागरीकांसाठी करसवलती देणेत आलेला १०० कोटी २० लाख रुपयांचा, २०२१-२२ चा अर्थ संकल्प एकमताने मंजूर इंदापूर नगरपरिषदेचा कोणताही करवाढ नसलेला व नागरीकांसाठी करसबलती देणेत आलेला रुपये १०० कोटी २० लाख रुपयांचा, ९.५६ लक्ष शिलकीचा सन २०२१-२२ चा अर्थ संकल्प नुकताच एकमताने मंजूर झालेची माहिती नगराध्यक्ष मा.अंकिता शहा यांनी या वेळी शहा बोलताना म्हणाल्या की दि.  २४/२/२०२१ रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत दिली. या सभेस उपनगराध्यक्ष धनंजय पाटील , सर्व विभागाचे सभापती सर्व नगरसेवक नगरसेविका व मुख्याधिकारी श्रीमती निर्मला राशीनकर व सर्व विभागाचे विभाग प्रमूख उपस्थित होते. या वेळी  रमाई आवास लाभार्थ्यासाठी व प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लाभार्थ्यांना भोगवटा दाखला, स्क्रुटिनी फी मध्ये ५० टक्‍के सुट देणेत आलेली आहे. बांधकाम परवानगी स्कॅनींग फी मध्ये ही कपात करणेत आलेली असून अत्यल्प दर ठेवणेत आलेले आहेत. वीर श्री मालोजीराजे भोसले यांचे नुतन स्मारकासाठी रुपये १ कोटी इतक्या रकमेची तरतुद करणेत आलेली आहे. राष्ट्रशाहीर अमर शेख यांचे स्मारकासाठी रुपये २...

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

कर्मयोगी सेंद्रिय खत वापरल्याने ऊस पिकाची जोमदार वाढ  इंंदापूर (दि. 21 फेब्रुवारी) कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखाना तयार करीत असलेल्या सेंद्रिय खताचा वापर कार्यक्षेञातील शेतकरी वापर करीत असल्याने ऊसपिक जोमदार बहरले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार यांनी दिली. मौजे कालठण नं. 2 येथील प्रगतशिल शेतकरी श्री. सुदाम चंद्रभान पाडुळे यांनी को.सी. 86032 या ऊस पिकासाठी कर्मयोगी सेंद्रिय खत वापरल्याने तसेच पडस्थळ, पिंपरी या भागातील प्लॉटची पाहणी पण या प्रसंगी करण्यात आली. या भागातील बहुतांश शेतकरी रासायनिक खतांचा अत्यल्प वापर करुन सेंद्रिय खतांचा मुबलक प्रमाणात वापर करीत असल्याचे शेतकरी श्री. सुदाम पाडुळे यांनी आवर्जुन सांगितले.      प्लॉटवरती शेतक-यांना माहिती देताना कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार म्हणाले, कारखान्याचे चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील व व्हाईस चेअरमन मा.श्रीमती पद्माताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट अशा सेंद्रिय व जैविक खताचे उत्पादन सुरु असून दिवसेंदिवस यास सभासदां...

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

इंदापूर पोलिसांनी प्रसंगावधानाने दोन सराईतांच्या  आवळल्या मुसक्या   इंदापूर :पोलीस पथकाची धडक कारवाई पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना मिळालेल्या माहीती वरुन पोलीस हवालदार दिपक पालके, महीला पोलीस हवालदार माधुरी लडकत, पोलीस काॅन्टेबल विनोद दासा मोरे व अर्जुन भालसिंग यांच्या  पथकाने टाकलेल्या छाप्यात सतीश भानुदास सूर्यवंशी वय 31 वर्ष राहणार कळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे 2) विष्णू पोपट भोसले  वय 21 वर्ष  राहणार गागरगाव (लोंढे वस्ती) तालुका इंदापूर जिल्हा पुणे दि. 20/02/2021रोजी 11/30 वा चे सुमारास  भावडी ता इंदापूर जि. पुणे गावचे हद्दीत एका महिंद्रा कंपनीचे पिक अप जिप नंबर MH 12/SF 95 79 असा असलेला मध्ये एक लोखंडी धारदार पाते असलेली तलवार व लोखंडी धारदार पाते असलेला कोयता अशी घातक हत्यारे बाळगले स्थितीत मिळून आलेने इंदापुर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर  नंबर 137/2021 भा द वि क. आर्म अॅक्ट 4 ,25 भा द वि कलम 34 दाखल करून  पुढील तपास पोलीस हवालदार पालके ब नं 1688 करीत आहेत. यातील सतिश भानुदास सुर्यवंशी हा सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर य...

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा-दत्तात्रय भरणे  इंदापूर शहरातील अरबाज शेख मित्र परिवाराच्या वतीने युवक नेते अरबाज शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.या वेळी  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावातच उर्जा आहे, या वेळी  राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा,राष्ट्रवादी शहाराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी नगरसेवक व धर्मवीर संभाजी मित्र मंडळाचे विश्वस्त श्रीधर बाब्रस, नगरसेवक पोपट शिंदे  आजी माजी नगरसेवक,कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. 

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट भिमाई आश्रमशाळा इंदापूर येथील विविध कामांचे उद्घाटन  इंदापूर:शिवराज्याभिषेक शिल्प, प्राचार्य कार्यालय, लोक प्रबोधनकार आण्णाभाऊ साठे ग्रंथालय,  गोजाई गार्डन व तुळसमार्ई गार्डन चे उद्घाटन समारंभ  शनिवार दि. २० फेब्रुवारी २०२१ रोजी सायं. ५-३० वा. मा.ना.श्री. दत्तात्रय (मामा) भरणे राज्यमंत्री, सामान्य प्रशासन महा. राज्य व पालकमंत्री, सोलापूर जिल्हा यांच्या हस्ते पार पडला,ते इंदापूर शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट भिमाई आश्रमशाळा इंदापूर या ठिकाणी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मात्र त्यांच्या मागे पुढील कार्यक्रमाची लगबग ही तितकीच होती.सर्व कार्यक्रम नियोजित वेळेत आवरुन पुढील नियोजित कार्यक्रम स्थळी उपस्थित राहणे यासाठी त्यांची धावपळ चालू असतानाच मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मनमिळाऊ  स्वभाव इंदापूर करांना पहायला मिळाला आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला सर्व जन आश्चर्यचकीत झाले. या आश्रमशाळेतील मुलांकडे भरणे यांची बारीक नजर होती. जाता-जाता मं...

लक्ष्मी वैभव न्यूज,शिवसृष्टी न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा  इंदापूर:आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचे अढळ स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे, पण तोंडावर मास्क आहे.छत्रपती दैवत का आहे, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरवणार असल्याचे आज सांगितले. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, आमदार विनायक मेटे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाक...

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर, लोकमान्य नगर यांच्या सयुंक्त विद्यमानाने छञपती शिवाजी महाराज जयंती साजरी  इंदापुर प्रतिनिधी:डाॅ.आंबेडकर नगर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर, लोकमान्य नगर यांच्या सयुंक्त विद्यमानाने छञपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरूवातीला राज्य मंञी दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्याच बरोबर इतर मान्यवरांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी इंदापुर नगरपरिषदेचे नगरसेवक व आरोग्य सभापती अनिकेत वाघ तसेच विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे ,नगरसेवक अमर गाडे, स्वप्निल राऊत,प्रा.अशोक मखरे, मा. नगरसेवक दादासाहेब सोनवणे,मा. नगरसेवक श्रीधर बाब्रस सामाजिक कार्यकर्ते अनिल ढावरे,बारामती लोकसभा मतदार कार्यध्यक्ष  RPI बाळासाहेब सरवदे, सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव शिंदे, इंदापुर RPI तालुका अध्यक्ष संदीपान कडवळे मा.नगरसेवक हरिदास हराळे. राजू गुळीक,प्रशांत ऊंबरे,अॅड. पंकज सुर्यवंशी, सुहास मोरे गुरूजी,गौरव राऊत,शुभम पवार...

लक्ष्मी वैभव न्यूज ,शिवसृष्टी न्यूज

इंदापूरात आय काॅलेज समोर शिवजयंती उत्साहात साजरी   इंदापूर:हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले.आज संपूर्ण देशात शिवजयंती साजरी होत आहे तशाच प्रकारे इंदापूर येथील आय काॅलेज समोर शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी  शिवजन्मोत्सव साजरा करताना महिलांनी पाळना गाऊन सर्वजन  मंत्र मुग्ध झाले,यावेळी  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, अंकिता शहा नगराध्यक्षा इंदापूर नगरपालिका , बापू जामदार, कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित पोलिस उपनिरीक्षक  अजित जाधव , डाॅ. पंकज गोरे ,जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्षा प्रा.जयश्री गटकुळ   ...

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

  कर्मयांगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यावरशिवजयंती साजरी  इंदापूर:   दि 19/2/2021 कर्मयांगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये आज छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करणेत आली कारखान्याचे कर्तव्य दक्ष  कार्यकारी संचालक श्री.बाजीराव जी.सुतार यांचे शुभहस्ते छञपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पुजन करणेत आले यावेळी कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी जी एस कदम, शेतकी अधिकारी किशोर हिंगमिरे, चीफ केमिस्ट कांदे,  पर्चेस ऑफीसर  श्री. पाठक, सिव्हील इंजिनिअर श्री. पठान, गोडावून किपर श्री. सावंत, इतर सर्व खाते व विभागप्रमुख उपस्थित होते.

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

शिवजयंती निमित्त ऑनलाईन शिवजयंती स्पर्धा 2021 चे आयोजन इंदापूरः  शिवजयंती व शिवविचारांच्या संकल्पनेवर आधारित ऑनलाईन शिवजयंती स्पर्धा 2021 चे आयोजन जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचतगट असो. च्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्या व इस्माच्या सहअध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या संकल्पनेतून 'शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात" या ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.    या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर  स्पर्धेचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.स्पर्धेत सहभागी व्यक्‍तींनी शिवछत्रपतींच्या कार्याची ओळख करून देणारी वेशभूषा, रांगोळी, स्व:ता काढलेले चित्र, लाईट डेकोरेशन, गडकिल्ले प्रतिकृती, गीत गायन, शिववंदना यांचा व आपल्या नव कल्पनांचा समावेश करावा.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  +91 8669479696 किंवा 9860414137 नंबर वरती, व्हाट्सअप वरून, आपले पुर्ण नाव, मोबाईल नंबर, पत्ता व आपण आपल्या निवासस्थानी  साजरी केलेल्या  शिवजयंती उत्सवाचे , २ ते ३ मिनिटांचे व्हिडिओ किंवा फोटो स्वरुपात दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी स.६ ते सायं ९ पर्यंत पाठवावे.   ...

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

  राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुणे जिल्हा प्रभारी पदी श्री.किरण गोफणे यांची निवड  इंदापूर:राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुणे जिल्हा प्रभारी पदी श्री किरण गोफणे यांची  नियुक्‍ती करण्यात आली पक्ष वाढीसह संघटनामक बांधणी मजबुत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याकरीता आपले योगदान राहील असा पक्षाचा  विश्वास असल्यामुळे  राष्ट्रनायक मा.महादेवजी जानकर  यांच्या ध्येय धोरणानुसार किरण गोफणे यांची  कार्याप्रती यशस्वी जबाबदारी पार पाडून मोलाचे कार्य करतील,आशी आशा व्यक्त केली,  किरण गोफणे यांनी जून २००६ते जुलै २००८पर्यंत इंदापूर शहर अध्यक्ष २००८ते जुलै२०१६पर्यंत इंदापूर तालुका अध्यक्ष २००८ते२०१४पर्यंत करमाळा व माढा विधानसभा संपर्क प्रमुख,२००१६तेआता पर्यंत पुणे जिल्हा उपाध्यक्ष,२०२०ते१० फेब्रुवारी २०२१पर्यंत पश्चिम विदर्भ प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांची निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन  राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार व प्रदेशाध्यक्ष डाॅ.रत्नाकर गुट्टे यांच्या सहीचे पत्र गोफणे यांना दिले,

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची 140 वी पुण्यतिथि साठे नगर येथे साजरी  इंदापूर:राष्ट्रपुरूष लहुजी राघुजी साळवे. यांचा  जन्म 14 नोव्हेंबर 1774 रोजी झाला. लहुजी वस्तादांचे पूर्वज हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारे होते. त्यामुळे त्यांना लहानपणीच आपल्या वडिलांकडून शस्त्रविद्येचे शिक्षण मिळाले होते. घोड्यावर बसणे, दांडपट्टा चालवणे, तलवार चालवणे, भाला फेकणे यात लहुजी साळवे निपुण होते. पुण्यात बुधवारपेठेतील गंजपेठेत त्यांची तालीम आहे. अशा या थोर क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद यांची आज जयंती. त्यानिमित्त या कट्टर राष्ट्रभक्ताला कोटी कोटी प्रणाम!क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची 140 वी पुण्यतिथि आज साठे नगर इंदापुर येथील अण्णा भाऊ साठेनगर ग्रंथालय या ठिकाणी करण्यात आली. या प्रसंगी मा. नगरसेवक ,श्री. दादासाहेब सोनवणे ,(सामाजिक कार्यकर्ते)श्री. अनिल ढावरे (सामाजिक कार्यकर्ते) श्री. ललेंद्र शिंदे  ,( सामाजिक कार्यकर्ते)श्री.बाळासाहेब आडसुळ,(सामाजिक कार्यकर्ते)श्री.ऊमेश ढावरे, नंदकुमार खंडाळे, अमित ढावरे, बापू मखरे,रणजित ढावरे,मोहन शिंदे,सतिश सोनवणे,संतोष शिंदे, ( सामाजिक...

लक्ष्मी वैभव न्यूज,शिवसृष्टी न्यूज

देवेंद्र फडणवीस,यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन पाटील यांचे विजवितरणअंदोलनाला अखेर यश,यंत्रणा झुकवण्याची ताकद फक्त भारतीय जनता पार्टीतच इंदापूर:  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, यांच्या मार्गदर्शनाखाली मा.ना.हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्याना घेऊन इंदापूर  विजवितरण समोर भले मोठे  अंदोलन केले होते, त्या अंदोलनाला अखेर यश, यंत्रणा झुकवण्याची ताकद फक्त भारतीय जनता पार्टीच्याच नेत्यात आहे आशी सर्वत्र चर्चा आहे, त्या मुळे आज राज्यात कृषी आणि घरगुती वीज बिल थकीत असल्याने महावितरण विभागाच्यावतीने वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आले आहे, त्यामुळे सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच आता कृषी पंपाबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थोडी नरमाईची भूमिका घेतली आहे.या मुळे महाराष्ट्रातील  शेतकरी वर्गात आनंदी वातावरण आहे,  सरकारच्या ऊर्जा मंत्रालय विभागाने दोन पावलं मागे जात शेतकऱ्यांना तूर्तास थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी वीज पुरवठा तोडण्या वरून नाराजी वाढत असल्याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी थोडीशी सौ...

लक्ष्मी वैभव न्यूज,शिवसृष्टी न्यूज

भारत मुक्ती मोर्चा चे संघटन कौशल्य व नेतृत्व विकास शिबीर संपन्न-अॅड राहुल मखरे  इंदापूर:संघटन चालवण्यासाठी वेळ, पैसा, बुध्दी, हुनर आणि श्रम या साधन संसाधनाची आवश्यकता असते. बामसेफ_हे_सामाजिक_संघटन_आहे. प्रचलित व्यवस्था बहुजन समाज विरोधी आहे आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी बहुजन महापुरुषांनी आपल्या जिवाची बाजी लावली.  व्यवस्था परिवर्तनाची चळवळ चालवत असताना साधन संसाधनांची आवश्यकता असते. जर साधने पुंजीपतींकडून घेतली तर पुंजीपतींच्या मर्जीवर संघटन /पक्ष चालते. जो_सहारा_देता_है_वो_इशारा_भी_करता_है' म्हणजेच, पुंजीपतींच्या हितासाठीच संबंधित संघटनेला /पक्षाला काम करावे लागते. अश्या संघटना समाजविरोधी कारवाया करतात.    परंतु, बामसेफ हे बहुजन समाजाच्या साधन संसाधनावर चालते. त्यामुळे बामसेफ हे समाजाप्रती इमानदार आहे. बामसेफ ने जो महापुरूषांच्या आंदोलनाचा उद्देश होता, तोच उद्देश निर्धारित केला आहे. अर्थातच बामसेफ हे समाजहितासाठी स्वाभिमानी लढाई लढत आहे. म्हणून सामाजिक इमानदारीची जाण असलेल्या इंदापूर, बारामती, दौंड, करमाळा, माढा आणि माळशिरस च्या क...

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

शिवसेनेच्या वतीने जनता दरबार भरवून अडीअडचणी विचारत घेऊन तात्काळ तोडगा काढणार-नितीन शिंदे   इंदापूरःतालुक्यातील भिगवण येथील शिवसेना संपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी  इंदापूर तालुका शिवसेना प्रमुख नितीन शिंदे यांनी या कार्यालयास  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट स्वरुपात दिली,या वेळी बोलताना नितीन शिंदे म्हणाले की काम कोणतेही आसुद्या शिवसेना तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल,  यावेळी.विभागप्रमुख पांडुरंग सोनवणे, विभागप्रमुख पांडुरंग वाघ, उपविभागप्रमुख दत्तात्रय कदम, शाखाप्रमुख रामचंद्र पाचांगणे, मुबीन मातीसे, फिरोज पठाण, कालिदास एकाड आदि पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.     सदर कार्यालयात अनेक नागरिक व शेतकरी विविध तक्रारी व अडीअडचणी घेऊन हजर होते.  त्यांच्या समस्या जाणून घेऊन तात्काळ सोडवण्यासाठी तहसिलदार, पोलीस स्टेशन, महावितरण, कृषी विभाग, सेतू आदि ठिकाणी त्यांच्यासमोर फोन केला असता,अधिकारी मंडळीने तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला,  व अनेक प्रश्न लगेच मार्गी लावले.लवकरच भिगवण येथील  शिवसे...

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

भारतीय जवानांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करून  पुलवामा शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली-माजी सैनिक महादेव सोमवंशी  इंदापूर:देशाला हादरवून सोडणाऱ्या  पुलवामा दहशतवादी हल्ल्याला  आज दोन वर्षे पूर्ण झाली. 14 फेब्रुवारी 2019 साली झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले होते. देशभर या शहिदांचे स्मरण करण्यात येत असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. या 40 शहीदांमध्ये CRPF च्या 76 व्या बटालियनच्या 5 जवानांचा समावेश होता. तसेच भारतीय जवानांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्यात आले पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी CRPF च्या बसवर हल्ला केला. त्यावेळी त्या बसमधून प्रवास करत असलेले 40 जवान शहीद झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. त्या शुरवीरांना इंदापूर तालुक्यातील माजी सैनिक संघटना, युवाक्रांती प्रतिष्ठान, शिवभक्त परिवाराचे वतीने इंदापूर मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली या वेळी दिवे हातात घेऊन माजी सैनिक व शिवसेना शहर प्रमुख, महादेव सोमवंशी, नगरसेवक प्रशांत शिताप, यांनी या कार्यक्रमाचे आयोजन ...

लक्ष्मी वैभव न्यूज,शिवसृष्टी न्यूज

शहा गावचा नावलौकिक विकासातून करावा.. इंदापूर : (प्रतिनिधी) ' खुले संरपंच पद असताना देखील मागासवर्गीय तरुण नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य कुमारी पुनम कडवळे हिला सरपंच केले. खरोखरच या गावातील प्रतिनिधींनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. म्हणूनच गावाने दिलेल्या संरपंच पदाच्या संधीचा फायदा घेऊन शहा गावचा विकास करुन नावलौकिक करावा असे मत पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संघटक सचिव शिवाजीराव मखरे यांनी व्यक्त केले.      डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर मधील जेतवन बुद्ध विहारात नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.      सुरुवातीला नूतन सरपंच कुमारी पूनम कडवळे यांनी गौतम बुद्धांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करून दिपप्रज्वलन केले. तर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्वात तरुण नुतन महिला सरपंच कु. पूनम कडवळे व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.     ...

लक्ष्मी वैभव न्यूज,शिवसृष्टी न्यूज

वेब पोर्टलबाबत बेजबाबदार वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ इंदापूर तहसिलदार यांना निवेदन .  इंदापूर : औरंगाबाद (मराठवाडा) विभागाचे माहिती संचालक गणेश रामदासी यांनी वेब पोर्टल बाबत केवळ सवंग प्रसिद्धीसाठी बेजबाबदार वक्तव्य केले होते. याच्या निषेधार्थ त्यांना सेवेतून बडतर्फ करावे या मागणीकरीता इंदापूर (पुणे)  येथील वेब पोर्टल संपादक, पत्रकारांनी इंदापूर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.          यावेळी महा डिजिटल मीडिया असोसिएशन या डिजिटल मीडियातील पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या राज्यातील पहिल्या स्वः नियामक संस्थेचे पदाधिकारी संपादक धनंजय कळमकर, सुरेश जकाते, पत्रकार काकासाहेब मांढरे, कैलास पवार, श्रेयश नलवडे, जितेंद्र जाधव, इम्तियाज मुलाणी, सिद्धार्थ मखरे,विजय शिंदे आदी वेब पोर्टल व युट्यूब चॅनेल चे पत्रकार उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे औरंगाबाद (मराठवाडा) विभागाचे संचालक गणेश रामदासी यांनी बीड येथे व्याख्यानमालेत “ यूट्यूब आणि पोर्टल हे अनधिकृत असून त्याला मान्यताप्राप्त पत्रकारिता नाही, अनेक प्रकरणात कार्यवाही करण्याची भूमिका क...

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

पॅडल फॉर हिस्ट्री उपक्रमांतर्गत हर्षवर्धन पाटील यांनी केला इंदापूर ते सरडेवाडी सायकल प्रवास   इंदापूर: बारामती स्पोर्ट फाउंडेशन कडून पॅडल फाॅर हिस्ट्री या मोहिमेअंतर्गत एकच ध्यास ३५० किल्ले सायकल प्रवास हे अनोखे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील ऐतिहासीक किल्ल्यांना सायकल वरुन भेटी देण्यात येणार आहेत.आज दि.14 फेब्रुवारी रोजी या अभियानांतर्गत बारामती ते परांडा सायकल रॅली चे आयोजन करण्यात  करण्यात येत असून इंदापूरमध्ये ही रॅली दाखल होताच माजी मंत्री व भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी या रॅलीचे जंगी स्वागत करून  सरस्वतीनगर बाजूकडील बारामती उड्डाणपूल ते सरडेवाडी येथील हॉटेल स्वामीराज इथेपर्यंत असा पाच किलो मीटरचा सायकल प्रवास करून युवकांना पर्यावरण, शारीरिक तंदुरुस्ती आणि ऐतिहासिक किल्ल्यासाठीच्या  मोहिमेस पाठिंबा दिला.  यावेळी आय काॅलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच इंदापूर सायकल क्बलचे सदस्य सहभागी झाले होते.बारामती स्पोर्ट फाउंडेशन चे प्रमुख आयर्नमॅन सतिश ननवरे यांच्या मार्गदर्शना...

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

इंदापूर येथे भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन,37 ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांचा सत्कार इंदापुरात सत्ताधाऱ्याऱ्यांविरुद्ध कौल- हर्षवर्धन पाटील   इंदापूरः येथे भारतीय जनता पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व मिळवलेल्या तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींच्या नूतन सरपंच,उपसरपंच यांचा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज शनिवारी (दि.13) सत्कार करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. इंदापूर तालुक्यतील जनतेने तालुक्यातील सत्ताधाऱ्याविरुद्ध दिलेला हा कौल असून, तालुक्यावर भाजपचे वर्चस्व असल्याचे या निवडणुकीतून पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे प्रतिपादन हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार सभेत बोलताना केले.            इंदापूर येथील शहा संस्कृतिक भवन मध्ये तालुका भाजपच्या वतीने तालुक्यातील नूतन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी इंदापूर तालुक्यात निवडणूक झालेल्या 60 ग्रामपंचायतींपैकी  भाजपच्या ताब्यातील 37 ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक...

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

ऐतिहासिक वास्तूचे डागडुजी करून इंदापूर चा इतिहास जपावा नाहीतर इंदापूर शहर काँग्रेस कडून आंदोलन -चमनभाई बागवान  इंदापूर:च्या ऐतिहासिक वास्तू असलेली इंदापूर शहराची वेस व तलाव याचे  पावसात फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच या वास्तू धोकादायक बनल्या आहेत. ह्या वास्तु इंदापूरच्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत व त्या आपण जपल्या पाहिजेत. गेल्या काही दिवसा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने शहरांमध्ये 33 कोटी कामाचे शुभारंभ केले पण ह्या महत्त्वाच्या कामाचे विसर पडला असे मत इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी व्यक्त केले.                 इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे व नगरसेवक स्वप्नील राऊत यांच्या बरोबर झालेल्या चर्चेत तलावाच्या भिंती साठी निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले व इंदापूर शहराच्या वेशीचे काम देखील लवकरच वरिष्ठांशी बोलून मार्ग काढू असे ते बोलले.                                 नगराध्...

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

केंद्र सरकारने 60 लाख मे.टन साखर निर्यातीस अनुदान देण्याचा निर्णय  -हर्षवर्धन पाटील                 इंदापूर: केंद्र सरकारने 60 लाख मे.टन साखर निर्यातीस अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या निर्यातीसाठी विविध अडचणी येत असल्याने आजपर्यंत फक्त 12 लाख मे.टन साखरेची निर्यात झाली आहे. त्यामुळे साखर निर्यात लवकर होणेसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने सुविधा उपलब्ध करून देण्याची तसेच केंद्र सरकारने निर्यात कोट्याचे पुनरावलोकन करण्याची मागणी राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.12) केली.               साखर निर्यात धीम्या गतीने होत असल्याने शेतकऱ्यांना उसाच्या एफआरपीचे पैसे वेळेवर देण्यास अडचणी येत आहेत. तसेच 60 लाख मे.टन साखर लवकर निर्यात झाली तर देशातील साखरेच्या दरात वाढ होणार आहे. मात्र आज पर्यंत फक्त 25 लाख मेट्रिक टन निर्यात साखरेचे करार झाले आहेत. त्यापैकी 12 लाख मेट्रिक टन साखर इंडोनेशियाला निर्यात झाली आहे. साखरेच्या निर्यातीसाठी कंटेनरची कमतरता भासत आहे....

लक्ष्मी वैभव न्यूज,शिवसृष्टी न्यूज

संजय (भैय्या) सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त १४फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर इंदापूरः तालुक्यातील धडाकेबाज नेते व गोरगरिब जनतेचा कैवारी मा.श्री.संजय (भैय्या) सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व उजनी मत्स्यमार व्यवसायिक सामाजिक विकास  संस्थेचे उद्घाटन मा.ना.श्री. दत्तात्रय (मामा) भरणे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा,मा.श्री.जयदीप भाई कवाडे  पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष, व प्रमुख उपस्थिती,मोहोळ तालुक्याचे लोकप्रियआमदार यशवंत तात्या माने,श्री. प्रदीप (दादा) गारटकर  जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस,प्रविण भैय्या माने, पुणे जि. प. सदस्य यांच्या उपस्थितीत १४फेब्रुवारी२०२१रोजी   सकाळी 10 वाजता संपन्न होत आहे. या वेळी विशेष उपस्थिती म्हणून  मा. श्री.  श्री.मधुकर भरणे मा. श्री. अमित सोनवणे, मा.श्री. सोमनाथ भोसले मा.श्री. लखन भंडारी, सायंकाळी ७-०० वा. सर्व हितचिंतकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आसे आवाहन संजय भैय्या सोनवणे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्...

LAXMI VAIBHAV NEWS,SHIVSRUSTHI NEWS

Viraj Sridhar Babras leaves for England (U. K.) to pursue Master Degree (M.S.)  Indapur: Former city corporator Shridhar Babras' son Chi.  Viraj Sridhar Babras left for Civil Structure, England (U. K.) to pursue a Master's Degree (M.S.).  On this occasion, District President of NCP Pradipdada Garatkar gave best wishes.  Similarly, Minister of State for Public Works and Construction Dattatraya Mama Bharne conveyed greetings over the phone. Hon'ble Deputy Mayor Dhananjay Babras, Former Corporator Vinayak Babras, Corporator Rajendra Chowgule, Balasaheb Vyavahare, Vilas Babras, Former Corporator Shridhar Babras etc. were present on the occasion.