भारत मुक्ती मोर्चा चे संघटन कौशल्य व नेतृत्व विकास शिबीर संपन्न-अॅड राहुल मखरे
इंदापूर:संघटन चालवण्यासाठी वेळ, पैसा, बुध्दी, हुनर आणि श्रम या साधन संसाधनाची आवश्यकता असते. बामसेफ_हे_सामाजिक_संघटन_आहे. प्रचलित व्यवस्था बहुजन समाज विरोधी आहे आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी बहुजन महापुरुषांनी आपल्या जिवाची बाजी लावली.
व्यवस्था परिवर्तनाची चळवळ चालवत असताना साधन संसाधनांची आवश्यकता असते. जर साधने पुंजीपतींकडून घेतली तर पुंजीपतींच्या मर्जीवर संघटन /पक्ष चालते. जो_सहारा_देता_है_वो_इशारा_भी_करता_है' म्हणजेच, पुंजीपतींच्या हितासाठीच संबंधित संघटनेला /पक्षाला काम करावे लागते. अश्या संघटना समाजविरोधी कारवाया करतात.
परंतु, बामसेफ हे बहुजन समाजाच्या साधन संसाधनावर चालते. त्यामुळे बामसेफ हे समाजाप्रती इमानदार आहे. बामसेफ ने जो महापुरूषांच्या आंदोलनाचा उद्देश होता, तोच उद्देश निर्धारित केला आहे. अर्थातच बामसेफ हे समाजहितासाठी स्वाभिमानी लढाई लढत आहे. म्हणून सामाजिक इमानदारीची जाण असलेल्या इंदापूर, बारामती, दौंड, करमाळा, माढा आणि माळशिरस च्या कार्यकर्त्यांनी काल "दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर" समारोप प्रसंगी १,००,०००(एक लाख रू.) चा निधी मा.डी.आर. ओहोळ यांचेकडे सुपूर्द केला.
या कार्यक्रम चे उद्घाटन महेंद्र(दादा)रेडके (मा.सभापती, पचायत समिती, इंदापूर यांच्या हस्ते करण्यात आले तर ,प्रमुख पाहुणे म्हणून मा. अॅड. राहुल मखरे,महासचिव बीएमपी , मा. पांडुरंग रायते अध्यक्ष शेतकरी संघटना, मा, सतिश(गोटू) पांढरे पंचायत समिती सदस्य, हे उपस्थित होते, या वेळी अॅड. राहुल मखरे,महासचिव बहुजन मुक्ती पार्टी, हे बोलताना म्हणाले की, बुद्धाच्या प्रचार व प्रसारामुळे शैक्षणिक,व सामाजिक क्रांती घडवली, आसेही ते म्हणाले, या कार्यक्रमचे प्रशिक्षक म्हणून मा.डी.आर. ओहोळ (राष्ट्रीय प्रधान महासचिव, बामसेफ नवी दिल्ली) यांचे दोन दिवशीय व्याख्यान आयोजित करण्यात आले होते,यावेळी मा. सुखदेव चव्हाण मा. नंदकुमार गायकवाड मा. आनंदराव थोरात मा. काकासाहेब जाधव मा. गोरकक्ष बारवकर,मा. संजय(डोनाल्ड) शिंदे मा. आर.आर. पाटील मा. नानासाहेब चव्हाण मा. बाबासाहेब भोंग मा.डॉ. दत्तात्रय जगताप मा. राहुल शिंगाडे मा.अँड. तुकाराम राऊत मा. निलेश बनकर ,मा. सुशिल अहिवळे मा. गोरख फुलारी मा. बाळासाहेब तोरमल मा. रिकेश चव्हाण ,मा. भारत दळवी मा. गौतम खरात मा. अशोक होले मा. कय्युम शेख मा. अतुल लंकेश्वर मा. नागेश वाघंबरे भा. अमोल मारकड मा. सौरभ वाघमारे मा. सिद्धार्थ लोंढे मा. नितीन गव्हाळे मा. लखन जाधव,वसीम शेख, सुरज धाईंजे मा. जाफर शेख मा. संतोष भिसे
मा. नागेश भोसले मा. आझाद(गौस) सय्यद मा. रोहित ढावरे मा. प्रशांत मखरे इत्यादी कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम इंदापूर पंचायत समिती येथील शंकरराव पाटील सभागृहात आयोजित करण्यात आला होता,
टिप्पण्या