मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज,शिवसृष्टी न्यूज

इंदापूर : (प्रतिनिधी) ' खुले संरपंच पद असताना देखील मागासवर्गीय तरुण नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य कुमारी पुनम कडवळे हिला सरपंच केले. खरोखरच या गावातील प्रतिनिधींनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. म्हणूनच गावाने दिलेल्या संरपंच पदाच्या संधीचा फायदा घेऊन शहा गावचा विकास करुन नावलौकिक करावा असे मत पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संघटक सचिव शिवाजीराव मखरे यांनी व्यक्त केले.
     डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर मधील जेतवन बुद्ध विहारात नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
     सुरुवातीला नूतन सरपंच कुमारी पूनम कडवळे यांनी गौतम बुद्धांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करून दिपप्रज्वलन केले. तर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्वात तरुण नुतन महिला सरपंच कु. पूनम कडवळे व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
     याप्रसंगी पुणे जिल्हा आर.पी.आय. चे सचिव संघटक शिवाजीराव मखरे, आर.पी.आय. तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, प्रा. अशोक मखरे, इंदापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा महिला विकास व बालकल्याण समिती सभापती राजश्री अशोक मखरे, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मखरे, मुकादम बापुराव मखरे,  अॅड. किरण लोंढे, पी.आर.पी. शहराध्यक्ष शिवाजी मखरे, दादासाहेब साबळे, बजरंग मखरे, विनोद मखरे, संतोष कडवळे, विष्णु पाटील, माजी उपसरपंच दिलीप कडवळे, धनाजी देवकाते, शंकर निकम, सतिश गंगावणे, दादा भोई, उमेश बनसोडे, राहुल मखरे, प्रमोद मखरे, यशपाल सरवदे, बाळासाहेब ढावरे, अक्षय मखरे, जनार्दन खरे  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
      या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थित लक्षणीय होती. पद्मिनी मखरे, अनिता मखरे, शारदा मखरे, रेखा मखरे, मिना मखरे, शिला लोंढे, त्रिशला मखरे, सविता कांबळे, रेश्मा मखरे, संजाली मखरे, कोमल मखरे, राणी शिंदे, अश्विनी काकडे, करुणा मखरे, विवेका मखरे, प्रतिक्षा मखरे, कोयल मिसाळ, समृद्धी मखरे, सम्यका मखरे, सई मखरे इत्यादींची उपस्थिती होती.
       प्रास्ताविक प्रा. अशोक मखरे यांनी केले तर आभारप्रदर्शन शिवाजी मखरे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...