इंदापूर:राष्ट्रपुरूष लहुजी राघुजी साळवे. यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1774 रोजी झाला. लहुजी वस्तादांचे पूर्वज हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारे होते. त्यामुळे त्यांना लहानपणीच आपल्या वडिलांकडून शस्त्रविद्येचे शिक्षण मिळाले होते. घोड्यावर बसणे, दांडपट्टा चालवणे, तलवार चालवणे, भाला फेकणे यात लहुजी साळवे निपुण होते. पुण्यात बुधवारपेठेतील गंजपेठेत त्यांची तालीम आहे. अशा या थोर क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद यांची आज जयंती. त्यानिमित्त या कट्टर राष्ट्रभक्ताला कोटी कोटी प्रणाम!क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची 140 वी पुण्यतिथि आज साठे नगर इंदापुर येथील अण्णा भाऊ साठेनगर ग्रंथालय या ठिकाणी करण्यात आली. या प्रसंगी मा. नगरसेवक ,श्री. दादासाहेब सोनवणे ,(सामाजिक कार्यकर्ते)श्री. अनिल ढावरे (सामाजिक कार्यकर्ते) श्री. ललेंद्र शिंदे ,( सामाजिक कार्यकर्ते)श्री.बाळासाहेब आडसुळ,(सामाजिक कार्यकर्ते)श्री.ऊमेश ढावरे, नंदकुमार खंडाळे, अमित ढावरे, बापू मखरे,रणजित ढावरे,मोहन शिंदे,सतिश सोनवणे,संतोष शिंदे, ( सामाजिक कार्यकर्ते) संजय खंडाळे,व सर्व समाज बांधव उपस्थित होते.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या