कर्मयोगी सेंद्रिय खत वापरल्याने ऊस पिकाची जोमदार वाढ
इंंदापूर(दि. 21 फेब्रुवारी) कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखाना तयार करीत असलेल्या सेंद्रिय खताचा वापर कार्यक्षेञातील शेतकरी वापर करीत असल्याने ऊसपिक जोमदार बहरले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार यांनी दिली. मौजे कालठण नं. 2 येथील प्रगतशिल शेतकरी श्री. सुदाम चंद्रभान पाडुळे यांनी को.सी. 86032 या ऊस पिकासाठी कर्मयोगी सेंद्रिय खत वापरल्याने तसेच पडस्थळ, पिंपरी या भागातील प्लॉटची पाहणी पण या प्रसंगी करण्यात आली. या भागातील बहुतांश शेतकरी रासायनिक खतांचा अत्यल्प वापर करुन सेंद्रिय खतांचा मुबलक प्रमाणात वापर करीत असल्याचे शेतकरी श्री. सुदाम पाडुळे यांनी आवर्जुन सांगितले.
प्लॉटवरती शेतक-यांना माहिती देताना कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार म्हणाले, कारखान्याचे चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील व व्हाईस चेअरमन मा.श्रीमती पद्माताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट अशा सेंद्रिय व जैविक खताचे उत्पादन सुरु असून दिवसेंदिवस यास सभासदांचा प्रतिसाद वाढत आहे. “कर्मयोगी शिवार फेरी” योजनेअंतर्गत कारखान्याने विविध भागातील सभासदांच्या प्रत्यक्ष प्लॉटवर जावुन शेतक-यांच्या अडीअडचणी समजुन घेवून त्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम चालू केलेला आहे. तसेच सभासदांनी मातीपरीक्षण तसेच जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक खते वापरण्याबाबत आवाहन केले. पर्यावरण व्यवस्थापक यांनी जमिनीचा कर्ब व सेंद्रिय खतांचे महत्व या विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी एस.जी.कदम, ऊसविकास अधिकारी गणेश पोळ, पर्यावरण व्यवस्थापक जे.व्ही.माने व कालठण भागातील विलास साहेबराव पाडुळे, सुनिल रामदास जगताप, गणेश गोविंद मेंगडे, राहूल लालासो जगताप, वर्षल मोहन पाडुळे, हारुन अब्दुल मुलाणी, आदिकराव भिमराव रेडके, संतोष बबन जगताप हे शेतकरी उपस्थित होते. सर्व उपस्थित ऊस उत्पादक सभासदांनी “कर्मयोगी शिवार फेरीचे” आभार व्यक्त केले व ही बाब कौतुकास्पद असलेचे नमूद केले.
टिप्पण्या