इंदापूरः शिवजयंती व शिवविचारांच्या संकल्पनेवर आधारित ऑनलाईन शिवजयंती स्पर्धा 2021 चे आयोजन जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचतगट असो. च्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्या व इस्माच्या सहअध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या संकल्पनेतून 'शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात" या ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.स्पर्धेत सहभागी व्यक्तींनी शिवछत्रपतींच्या कार्याची ओळख करून देणारी वेशभूषा, रांगोळी, स्व:ता काढलेले चित्र, लाईट डेकोरेशन, गडकिल्ले प्रतिकृती, गीत गायन, शिववंदना यांचा व आपल्या नव कल्पनांचा समावेश करावा.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी +91 8669479696 किंवा 9860414137 नंबर वरती, व्हाट्सअप वरून, आपले पुर्ण नाव, मोबाईल नंबर, पत्ता व आपण आपल्या निवासस्थानी साजरी केलेल्या शिवजयंती उत्सवाचे , २ ते ३ मिनिटांचे व्हिडिओ किंवा फोटो स्वरुपात दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी स.६ ते सायं ९ पर्यंत पाठवावे.
पाडवा, दसरा, दिवाळी जशी आपली संस्कृती तशीच साजरी करू घरोघरी यंदाची शिवजयंती तसेच या ऑनलाईन स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी केले.
टिप्पण्या