इंदापूरात आय काॅलेज समोर शिवजयंती उत्साहात साजरी
इंदापूर:हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले.आज संपूर्ण देशात शिवजयंती साजरी होत आहे तशाच प्रकारे इंदापूर येथील आय काॅलेज समोर शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शिवजन्मोत्सव साजरा करताना महिलांनी पाळना गाऊन सर्वजन मंत्र मुग्ध झाले,यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, अंकिता शहा नगराध्यक्षा इंदापूर नगरपालिका , बापू जामदार, कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित पोलिस उपनिरीक्षक अजित जाधव , डाॅ. पंकज गोरे ,जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्षा प्रा.जयश्री गटकुळ मुन्ना गुंडेकर,रोहित शिंदे, प्रशांत उंबरे सकल शिवभक्त परिवार इंदापूर तालुका यांचे वतीने इंदापूर मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली, या वेळी शालेय विद्यार्थ्यांना शिवचरित्र पुस्तके, शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले, हा कार्यक्रम सोशलडीस्टन्स ठेवून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला.
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या