इंदापूर:च्या ऐतिहासिक वास्तू असलेली इंदापूर शहराची वेस व तलाव याचे पावसात फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच या वास्तू धोकादायक बनल्या आहेत. ह्या वास्तु इंदापूरच्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत व त्या आपण जपल्या पाहिजेत. गेल्या काही दिवसा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने शहरांमध्ये 33 कोटी कामाचे शुभारंभ केले पण ह्या महत्त्वाच्या कामाचे विसर पडला असे मत इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी व्यक्त केले.
इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे व नगरसेवक स्वप्नील राऊत यांच्या बरोबर झालेल्या चर्चेत तलावाच्या भिंती साठी निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले व इंदापूर शहराच्या वेशीचे काम देखील लवकरच वरिष्ठांशी बोलून मार्ग काढू असे ते बोलले.
नगराध्यक्षांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेत लवकरच इंदापूरच्या वेशीचे काम पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी दिले.
ह्या ऐतिहासिक वास्तूचे ताबडतोब डागडुजी करून इंदापूर चा इतिहास जपावा नाहीतर इंदापूर शहर काँग्रेस कडून आंदोलन केले जाईल असा इशारा इंदापूर शहर अध्यक्ष चमनभाई बागवान यांनी दिला.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, पुणे जिल्हा सरचिटणीस जकिर भाई काजी, शहर उपाध्यक्ष तुषार चिंचकर, भगवान पासगे, निवास शेळके, महादेव लोंढे, संतोष होगले, मिलिंद सावळे आदी उपस्थित होते.
टिप्पण्या