
रमाई आवास लाभार्थ्यासाठी व प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लाभार्थ्यांना भोगवटा दाखला, स्क्रुटिनी फी मध्ये ५० टक्के सुट देणेत आलेली आहे. बांधकाम परवानगी स्कॅनींग फी मध्ये ही कपात करणेत आलेली असून अत्यल्प दर ठेवणेत आलेले आहेत.
वीर श्री मालोजीराजे भोसले यांचे नुतन स्मारकासाठी रुपये १ कोटी इतक्या रकमेची तरतुद करणेत आलेली आहे. राष्ट्रशाहीर अमर शेख यांचे स्मारकासाठी रुपये २५ लक्ष इतक्या रकमेची तरतुद करणेत आलेली आहे. ज्योतिबा मंदिर विकास आराखडयासाठी रुपये २५ लक्ष इतक्या रकमेची तरतुद करणेत आलेली आहे. हजरतबुवा चांदशाह विकास आराखडयासाठी रुपये २५ लक्ष इतक्या रकमेची तरतुद करणेत आलेली आहे. पंधरावा वित्त अयोग
अ. नगरपरिषदेतील रेकॉर्डचे स्कॅनिंग व डीझोटलायजेशन साठी रू. ५लाख तरतूद करण्यात आली आहे. ब. घनकचरा व्यवस्थापनासाठी रू: १ कोटी २०लाख रकमेची तरतूद करण्यात आली आहे.
पंधरावा वित्त आयोग निधी मध्ये 3 कोटी रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे नगरोत्थान योजनेच्या लोकवर्गणीसाठी रू. ५० लाख रकमेची तरतूद करण्यात आली आहे. अल्पसंख्यांक अनुदान
सदर योजने अंतर्गत रू. १० लाख खर्च प्रस्तावीत आहे. महाराष्ट्र नगरोत्थान योजना भुयारी गटर योजनेसाठी प्राथमिक अवस्थेत रु.१५ कोटी रक्कम अंदाजपत्रकात अपेक्षित धरलेली आहे. सन २०२१-२२ मध्ये रस्ता अनुदान योजनेतुन रू. ३ कोटी रक्कमेचा खर्च मंजूर करण्यात आलेला आहे. त्यातुन नियोजीत कामे करण्याचे प्रयोजन आहे. सुजल निर्मल अभियान सन २०२१-२२ मध्ये रू. ५० लाख रकमेचे तरतूद करण्यात आली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना (नागरी दलितवस्ती योजना) योजने अंतर्गत प्रस्तावीत कामासाठी रू. २ कोटी रकमेची तरतुद केली आहे. रमाई आवास योजना
रमाई आवास योजने /प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत रू २ कोटी ५० लाख रेकमेचा खर्च मंजूर करण्यात आलेला आहे.
वैशिष्ट्यपूर्ण योजना वैशिष्ट्यपूर्ण याजने अंतर्गत क्रिडागण व इतर कामासाठी रू: १० कोटी मंजूर करण्यात आलेला केले आहे.
नागरी दलितेत्तर योजना योजनेअंतर्गत सन २०२१ २२ साठी रू. २ कोटी रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे. स्थानिक विकास निधी (आमदार /खासदार) योजनेअंतर्गत रू.२ कोटी रकमेचा खर्च मंजूर करण्यात आलेला आहे. अग्निशमन योजना योजनेअंतर्गत रू. १० लाख रकमेचा खर्च मंजूर करण्यात आलेला आहे.
प्रधान मंत्री आवास योजना योजनेअंतर्गत रू. २ कोटी रकमेचा खर्च मंजूर करण्यात आलेला आहे.
स्वच्छ भारत अभियान योजना योजनेअंतर्गत रू. ७.५० कोटी रकमेचा खर्च मंजूर करण्यात आलेला आहे. आशी माहीती नगराध्यक्षा अंकिताताई शहा यांनी दिली,
टिप्पण्या