इंदापूर:शिवराज्याभिषेक शिल्प, प्राचार्य कार्यालय, लोक प्रबोधनकार आण्णाभाऊ साठे ग्रंथालय, गोजाई गार्डन व तुळसमार्ई गार्डन चे उद्घाटन समारंभ शनिवार दि. २० फेब्रुवारी २०२१ रोजी सायं. ५-३० वा. मा.ना.श्री. दत्तात्रय (मामा) भरणे राज्यमंत्री, सामान्य प्रशासन महा. राज्य व पालकमंत्री, सोलापूर जिल्हा यांच्या हस्ते पार पडला,ते इंदापूर शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट भिमाई आश्रमशाळा इंदापूर या ठिकाणी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मात्र त्यांच्या मागे पुढील कार्यक्रमाची लगबग ही तितकीच होती.सर्व कार्यक्रम नियोजित वेळेत आवरुन पुढील नियोजित कार्यक्रम स्थळी उपस्थित राहणे यासाठी त्यांची धावपळ चालू असतानाच मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मनमिळाऊ स्वभाव इंदापूर करांना पहायला मिळाला आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला सर्व जन आश्चर्यचकीत झाले.
या आश्रमशाळेतील मुलांकडे भरणे यांची बारीक नजर होती. जाता-जाता मंत्री भरणे या मुलांकडे गेले आणि थेट मागचा पुढचा विचार न करता जमिनिवर मांडी घालून बसले आणि पोरांसोबत गप्पा मारू लागले. अर्थात मुलांसाठी थोडा वेळ त्यांनी दिला.पणं अतिशय घाही गरबडीत एखादा मंत्री आपली उंची सोडून थेट जमिनीवर कोणतीही बैठक व्यवस्था नसताना मातीत मांडी घालुन बसतो. हा त्याच्यातील साधेपणा पाहून उपस्थित मंडळी मात्र चक्रावून गेली. कार्यक्रमाच्या वेळी या शाळेतील मुले मैदानात जमीनीवर फुपुट्यात बसल्याचे भरणे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अध्यक्ष मखरे यांना पेवरब्लाॅक बसवण्यासाठी किती खर्च येईल असे विचारले आसता, पेवरब्लाॅक बसवण्यासाठी अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी 15लाखाची मागणी केली, पण राज्य मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले तात्या 15लाखात काम होईल का, मी 20लाख रूपये देतो, पण काम लवकर झाले पाहिजे,पुढील वेळीच्या कार्यक्रमात ही मुलं पेवरब्लाॅक वरच बसली पाहीजेत, असे म्हणताच सर्वत्र एकच चर्चा चालु झाली. मागितले १५लाखआणी मिळणार २०लाख आसा धडाकेबाज नेता इंदापूर तालुक्यातील जनतेला मिळाला, म्हणजे विकासगंगा येणारच आहे, या वेळी
.श्री. वसंतराव साळवे पुणे,अॅड. समीर टिळेकर .श्री. दिपक जाधव, यश उद्योग समुह, मा.श्री. बाळासाहेब वाघमारे मा.श्री. प्रदिप कांबळे मा.सो. आशाताई गोपीचंद गलांडे सरपंच, ग्रामपंचायत गलांडवाडी नं.२ मा.श्री. अंकूश सोनवणे पुणे मा.श्री. अनिल अवसरमल,उपस्थित होते तर या कार्यक्रम चे आयोजन मा. रत्नाकर मखरे अध्यक्ष, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट, इंदापूर यांनी केले होते, या वेळी मा.अॅड. राहुल मखरे कार्याध्यक्ष, मा. तानाजी मिसाळ उपाध्यक्ष, मा. अॅड. समीर मखरे सचिव मा. सौ. शकुंतला(काकी) मखरे सदस्या मा. सौ. अस्मिता मखरे कु.डॉ. अनार्या मखरे सदस्या मा.राहुल सवणे मा.श्रीम.पंचशिला दिनकर चंदनशिवे सदस्या मा.सौ. सविता गोफणे रखामगळ भा.सौ. अनिता साळवे मखरे उप प्राचार्या, माध्य. व कनिष्ठ महाविद्यालय, इंदापूर प्राचार्या, माध्य. व कनिष्ठ महाविद्यालय, इंदापूर , साहेबराज पवार मुख्याध्यापक,भिमाई आश्रमशाळा, इंदापूर मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर,
येथील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद भिमाई आश्रमशाळा, जिजाऊ नगर, इंदापूर, जि. पुणे येथे उपस्थित होते, हा कार्यक्रम सोशलडीस्टन्स ठेवून सॅनिटायझ व मास्कचा चा वापर करून पार पडला,
या कार्यक्रम चे सुत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले,
टिप्पण्या