इंदापूर शहरातील अरबाज शेख मित्र परिवाराच्या वतीने युवक नेते अरबाज शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.या वेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावातच उर्जा आहे, या वेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा,राष्ट्रवादी शहाराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी नगरसेवक व धर्मवीर संभाजी मित्र मंडळाचे विश्वस्त श्रीधर बाब्रस, नगरसेवक पोपट शिंदे
आजी माजी नगरसेवक,कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या