इंदापूर :पोलीस पथकाची धडक कारवाई पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना मिळालेल्या माहीती वरुन पोलीस हवालदार दिपक पालके, महीला पोलीस हवालदार माधुरी लडकत, पोलीस काॅन्टेबल विनोद दासा मोरे व अर्जुन भालसिंग यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात सतीश भानुदास सूर्यवंशी वय 31 वर्ष राहणार कळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे 2) विष्णू पोपट भोसले वय 21 वर्ष राहणार गागरगाव (लोंढे वस्ती) तालुका इंदापूर जिल्हा पुणे
दि. 20/02/2021रोजी 11/30 वा चे सुमारास भावडी ता इंदापूर जि. पुणे गावचे हद्दीत एका महिंद्रा कंपनीचे पिक अप जिप नंबर MH 12/SF 95 79 असा असलेला मध्ये एक लोखंडी धारदार पाते असलेली तलवार व लोखंडी धारदार पाते असलेला कोयता अशी घातक हत्यारे बाळगले स्थितीत मिळून आलेने इंदापुर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 137/2021 भा द वि क. आर्म अॅक्ट 4 ,25 भा द वि कलम 34 दाखल करून पुढील तपास पोलीस हवालदार पालके ब नं 1688 करीत आहेत.
यातील सतिश भानुदास सुर्यवंशी हा सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर यापुर्वी इंदापुर, पिंपरी चिंचवड येथे दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून आणखीन हत्यारे व इतर चोरीचे गुन्हे उघडकीस येतात काय याचा तपास पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली दिपक पालके हे करीत आहेत.
टिप्पण्या