इंदापूरःतालुक्यातील भिगवण येथील शिवसेना संपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी इंदापूर तालुका शिवसेना प्रमुख नितीन शिंदे यांनी या कार्यालयास हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट स्वरुपात दिली,या वेळी बोलताना नितीन शिंदे म्हणाले की काम कोणतेही आसुद्या शिवसेना तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल, यावेळी.विभागप्रमुख पांडुरंग सोनवणे, विभागप्रमुख पांडुरंग वाघ, उपविभागप्रमुख दत्तात्रय कदम, शाखाप्रमुख रामचंद्र पाचांगणे, मुबीन मातीसे, फिरोज पठाण, कालिदास एकाड आदि पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
सदर कार्यालयात अनेक नागरिक व शेतकरी विविध तक्रारी व अडीअडचणी घेऊन हजर होते.
त्यांच्या समस्या जाणून घेऊन तात्काळ सोडवण्यासाठी तहसिलदार, पोलीस स्टेशन, महावितरण, कृषी विभाग, सेतू आदि ठिकाणी त्यांच्यासमोर फोन केला असता,अधिकारी मंडळीने तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला, व अनेक प्रश्न लगेच मार्गी लावले.लवकरच भिगवण येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उध्दाटन करून भिगवण व भिगवण परिसरातील सर्व सामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही तयार आहोत,अनेक भागात लवकर जनता दरबार भरवून तत्काळ अडीअडचणी विचारत घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे असेही शिवसेना इंदापूर तालुका प्रमुख नितीन शिंदे म्हणाले.
टिप्पण्या