इंदापूर:देशाला हादरवून सोडणाऱ्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली. 14 फेब्रुवारी 2019 साली झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले होते. देशभर या शहिदांचे स्मरण करण्यात येत असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. या 40 शहीदांमध्ये CRPF च्या 76 व्या बटालियनच्या 5 जवानांचा समावेश होता.
तसेच भारतीय जवानांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्यात आले पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी CRPF च्या बसवर हल्ला केला. त्यावेळी त्या बसमधून प्रवास करत असलेले 40 जवान शहीद झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.
त्या शुरवीरांना इंदापूर तालुक्यातील माजी सैनिक संघटना, युवाक्रांती प्रतिष्ठान, शिवभक्त परिवाराचे वतीने इंदापूर मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली या वेळी दिवे हातात घेऊन माजी सैनिक व शिवसेना शहर प्रमुख, महादेव सोमवंशी, नगरसेवक प्रशांत शिताप, यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी अनेक देशप्रेमी उपस्थित होते, हा कार्यक्रम सोशलडीस्टन्स ठेवून सॅनिटायझ व मास्कचा वापर करून पार पडला.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या