मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

 
इंदापूरः येथे भारतीय जनता पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व मिळवलेल्या तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींच्या नूतन सरपंच,उपसरपंच यांचा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज शनिवारी (दि.13) सत्कार करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. इंदापूर तालुक्यतील जनतेने तालुक्यातील सत्ताधाऱ्याविरुद्ध दिलेला हा कौल असून, तालुक्यावर भाजपचे वर्चस्व असल्याचे या निवडणुकीतून पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे प्रतिपादन हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार सभेत बोलताना केले.
           इंदापूर येथील शहा संस्कृतिक भवन मध्ये तालुका भाजपच्या वतीने तालुक्यातील नूतन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी इंदापूर तालुक्यात निवडणूक झालेल्या 60 ग्रामपंचायतींपैकी  भाजपच्या ताब्यातील 37 ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे होते. 
       हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले,' भाजपने जाहीरपणे दावा केलेल्या 38 ग्रामपंचायतींपैकी फक्त एका ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आज येथे आलेले नाहीत. 37 ग्रामपंचायतींच्या नूतन सरपंच व उपसरपंच या पदाधिकाऱ्यांचा सत्कार येथे करण्यात आला असून, काटी ग्रा.पं.चे उपसरपंचही भाजपकडे आले आहे.
              इंदापूर तालुक्यातील आगामी सर्व निवडणुका भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे एकजुटीने ताकदीने लढतील व जिंकतील. तालुक्यातील कार्यकर्ते हे अनेक पिढ्यांपासून आमचे बरोबर असून मानसिक नाळ जुळलेली आहे.त्यामुळे एकही कार्यकर्ता कुठे जाणार नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
         केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार लोकोपयोगी कामे करीत  आहे. तसेच राज्यातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष पक्षाचा जनाधार वाढत आहे. इंदापूर तालुक्यात नितीन गडकरी यांच्या माध्यमातून पालखी मार्ग इतर रस्त्यांसाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी  मिळाला आहे. भाजपकडे तालुक्यातील 37 ग्रामपंचायती असताना विरोधकांकडे सत्ता असूनही फक्त 23 ग्रामपंचायती दिसत असताना त्यांनी 42 ग्रामपंचायती आणल्या कोठून असा सवालही यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी केला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी राज्य शासने शेतकर्‍यांची वीज जोडणी पूर्ववत चालु करावी, अशी मागणी केली.  
             यावेळी बोलताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितले की, हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली आगामी सर्व निवडणुका ताकदीने लढविल्या जातील. हर्षवर्धन पाटील यांचे सर्व कार्यकर्ते एकसंघ आहेत. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विकास कामासाठी सर्व मदत केली जाईल.या वेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरतशेठ शहा,निराभिमा सह साखर कारखाना चे चेअरमन लालासाहेब पवार, व्हा. चेअरमन कांतीलाल झगडे, मयुरसिंह पाटील, हर्षवर्धन पाटील मोटार वाहतुक संघाचे चेअरमन रघुनाथ राऊत, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंदशेठ शहा, दुधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, इंदापूर विवीध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब पाटील, वामनराव सरडे, पांडुरंग शिंदे, माऊली चवरे, कर्मयोगी शंकरराव पाटील सह साखर कारखान्याचे संचालक राहुल जाधव, आंबादास शिंगाडे, शरदराव काळे, सचिन जामदार, संतोष देवकर, ललेंद्र शिंदे, इ.उपस्थित होते, 
        प्रास्ताविक तालुका भाजपचे अध्यक्ष शरद जामदार यांनी केले. यावेळी विलासराव वाघमोडे, बापूराव शेंडे, श्रीमंत ढोले, कुंभारगावच्या सरपंच उज्वला परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर व कैलास कदम यांनी तर आभार  शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी मानले. या कार्यक्रमास इंदापूर तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी,  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
___________________________
कुंभारगाव सरपंचाचा भाजप प्रवेश
 ---------------------------------------
कुंभारगाव  ग्रामपंचायतीच्या सरपंच उज्वला परदेशी यांनी आपल्या सहकारी ग्रामपंचायत सदस्यांसह हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. सरपंच उज्वला परदेशी ह्या भोई समाजाच्या असून तेथे सरपंचपद खुले असूनही भाजपने भोई समाजाला सरपंचपदाचा मान दिला आहे.

-----------
   आगामी काळामध्ये संकलन येथील 1 लाख लिटर पर्यंत होईल 
--------------------------------------------------
 इंदापूर येथील दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघ उत्कृष्टरित्या चालू असून,आगामी काळामध्ये संकलन 1 लाख लिटर पर्यंत जाईल,असे भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
_______________________________
या कार्यक्रमाचे दरम्यान इंदापूर तालुक्यातील सर्वच पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्यांचा कोल्हापूरी फेटा बांधून सन्मान करण्यात आला.हा माझा जवळचा,तो लांबचा आशी आवड निवड न करता सर्वांना समान धरून .आसा पत्रकारांचा विशेष कार्यक्रमात पहिल्यांदाच सन्मान झाला आसल्याची सर्वत्र चर्चा आहे,  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते