हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे बजावला मतदानाचा हक्क भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील इंदापूर:प्रतिनिधी दि.1/12/20 भाजप नेते व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बावडा (ता.इंदापूर) येथे मंगळवारी (दि.1)सकाळी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी रांगेत उभे राहून व कोरोनाचे शासनाचे नियम पाळून मतदान केले. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्रातील पदवीधर मतदार संघाच्या 3 व शिक्षक मतदार संघाच्या 2 अशा सर्व 5 जागी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मोठा विजय संपादन करतील,असा विश्वास व्यक्त केला. राज्यात अनैसर्गिक बनलेल्या महाविकास आघाडी सरकार विरोधातील नाराजी या मतदानातून दिसून येईल. निसर्गाचा नियम आहे की, अनैसर्गिक बाब जास्त काळ टिकत नाही, त्यामुळे हे सरकार आपोआपच पडणार आहे. राज्यात सर्वच पातळीवर हे सरकार अपयशी ठरल्याची टीकाही हर्षवर्धन पाटील यांनी केली. यावेळी मतदान बूथ वरील भाजप कार्यकर्ते व पदाधिकार्यांशी हर्षवर्धन पाटील यांनी संवाद ...
SHIVSRUSTHI NEWS