इंदापूर : येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर मधील जेतवन बुद्ध विहारात २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीला पुणे जिल्हा आर.पी.आय.चे सचिव-संघटक मा. शिवाजीराव मखरे यांचे हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तर माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे यांनी पुष्पहार अर्पण केला. सुभेदार तानाजी मोरे यांनी दिप प्रज्वलन करून गौतम बुद्धांच्या मुर्तीस पुष्प अर्पण केली.
पंचशील व त्रिशरण घेऊन धम्मपुजा करण्यात आली. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
याप्रसंगी आर. पी.आय.चे पुणे जिल्हा सचिव-संघटक शिवाजीराव मखरे, संदिपान कडवळे, प्रा.बाळासाहेब मखरे, प्रा.अशोकराव मखरे, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पोळ, नितीन गाडे, सतिश देठे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोरख मखरे, पांडुरंग मखरे, गौतम मखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल मखरे, हेमंत मखरे, प्रमोद मखरे, रोहित मखरे, सनी पोळ, अक्षय मखरे, नागेश सोनवणे, विकी मखरे, इत्यादींनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या