मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

 इंदापूर:राज्यामध्ये स्थापन झालेले  महाआघाडीचे सरकार हे अनैसर्गिकरित्या स्थापन झालेले सरकार आहे. एवढे बेफिकीर,संवेदनाहीन आणि निष्क्रिय सरकार आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात झालेले नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी ही विधानपरिषदेची निवडणूक आहे,असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी (दि. 20) इंदापूर येथे केले.
             इंदापूर येथे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार जितेंद्र पवार व पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित  कार्यक्रमात प्रवीण दरेकर बोलत होते.यावेळी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
          दरेकर पुढे म्हणाले,' संग्रामसिंह देशमुख आणि जितेंद्र पवार जिंकून आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल अटळ आहे. तो पायगुण या दोन्ही उमेदवरांच्यात आहे.केवळ जितेंद्र पवार किंवा संग्राम देशमुख आमदार बनणार एवढ्यापुरती हि निवडणूक सीमित नसून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दिशेने आणि भविष्याच्या दृष्टीने दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे. आज राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न,शेतकरी आत्महत्या,एसटी कर्मचाऱ्यांचा पगार,अतिवृष्टीची नुकसान भरपाई व वीज बिलासारखा ज्वलंत प्रश्न असताना सरकारकडे मात्र हे विषय समजून घ्यायला वेळ नाही.पाच वर्षात देवेंद्र फडणीस यांनी या राज्याला विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला.फडणवीस सरकारच्या काळामध्ये विनाअनुदानित शाळांना मदत करण्याचा निर्णय घेतला गेला. चंद्रकांत पाटील यांनी देखील या मतदारसंघात नेतृत्व करत असताना शिक्षकांच्या व पदवीधरांच्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र आजच्या सरकारचा संपूर्ण वेळ केवळ आणि केवळ बदल्या करण्यामध्ये चालला आहे. उद्याच्या गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करायची झाली तर केवळ आणि केवळ बदल्या करण्यामध्येच महा विकास आघाडी सरकारची नोंद होईल. 
   ते पुढे म्हणाले, बिहारचे नियोजन करायला प्रभारी म्हणून महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस होते. केंद्र सरकारचा थेट लाभ मिळत होता. शिवाय शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसा जात होता. केवळ बिहारच नाही तर इतर राज्यांमध्ये देखील भारतीय जनता पार्टीला नागरिकांनी मोठा जनाधार दिला आहे. महाराष्ट्रातील सरकार अपयशी ठरल्यानंतर या निवडणूका होत आहेत आणि म्हणून या निवडणूकांना अनन्य साधारण महत्व आहे.ग्राहकांना वाढीव बिले कमी करून देण्यापेक्षा ग्राहकांच्या जखमांवर मीठ चोळून ही वाढीव आलेली बिले बरोबरच आहेत आणि ते समजण्यासाठी आम्ही मेळावे घेऊ  समजावून सांगू असे बेताल वक्तव्य केले जात आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री हे काँग्रेसचे आहेत आणि ते तुमच्या सरकारचा भाग आहेत. त्यांनी दिलेला प्रस्ताव तुम्ही का मान्य करत नाही किंवा त्यांना पैसा का उपलब्ध करून देत नाहीत असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. यांना ग्राहकांचा प्रश्न सोडवायचा नाही. आज महाराष्ट्रात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून अशा वेळी मतदानाच्या माध्यमातून तो असंतोष व्यक्त केला जात असतो. म्हणून पदवीधरांनी आणि शिक्षक मतदारांनी हे दाखवून द्यायचे आहे. समोरच्याचे डिपॉझिट जप्त करून दोन्ही उमेदवार निवडून द्यावे.'
        हर्षवर्धन पाटील भाषणात म्हणाले, इंदापूर तालुक्यामध्ये 10861 पदवीधर मतदार आहेत तर 1208 शिक्षक मतदार आहेत. सरकारच्या एक वर्षाच्या निष्क्रिय कारभारानंतर आलेली ही पहिली निवडणूक असून इंदापूर तालुक्याने या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून संग्रामसिंह  देशमुख व शिक्षक मतदारसंघातून जितेंद्र पवार यांना विजयी करून महाराष्ट्राला या निवडणुकीच्या माध्यमातून संदेश देण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे इंदापूर तालुक्याने मतदार नोंदणी संख्येमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक मतदान नोंदणीची योग्य जबाबदारी पार पाडली त्याप्रमाणे आपल्या या दोन्ही मतदारांना मतदानामध्ये सर्वाधिक मताधिक्य इंदापूर तालुका देईल.
     जितेंद्र पवार म्हणाले,' शिक्षकांना शाळाबाह्य कामातून मुक्तता करणे, भ्रष्टाचारमुक्त कारभार, जुनी पेन्शन योजना लागू करणे, एक तारखेलाच वेळेवर पगार, शिक्षकांच्या प्रश्नासाठी ऑनलाइन सुविधा प्रणाली, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न तसेच संस्थाचालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काम करणारआहे.
     यावेळी आ.राहुल कुल, तानाजी थोरात, सुभाष माने, अविनाश मोटे आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार यांनी केले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी व आभार भाजपाचे शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी मानले.
_________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते