(दि. 28 नोव्हेंबर) – कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सेंद्रीय खत उत्पादन व विक्रीचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळ यांचे उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील म्हणाले की, दिवसेंदिवस कारखाना कार्यक्षेञातील जमिनीमधील सेंद्रीय कर्ब, स्फुरद, झिंक, फेरस या अन्नद्रव्याचे प्रमाण कमी होवू लागले असून याउलट क्षारता व पीएच वाढत चालला आहे. ही बाब सर्वांच्या द्रुष्टीने चिंताजनक आहे याचा परिणाम ऊस उत्पादनावर होत असून जर सभासद बांधवांनी रासायनिक खताचा वापर कमी प्रमाणात न केल्यास जमीनी नापीक होऊन उत्पादनात घट होईल या बाबी टाळण्यासाठी सर्वांनी ऊस पिकास जास्तीत जास्त कर्मयोगी सेंद्रीय खताचा वापर करणे आवश्यक आहे. कर्मयोगी सेंद्रीय खतामध्ये मुख्य, दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्ये तसेच विविध प्रकारच्या पेंडी अशाप्रकारे 14 घटक मिसळून हे उच्च प्रतीचे खत ना नफा ना तोटा या तत्वावर रु. 300/- प्रती बॅग याप्रमाणे विक्री करण्यात येत आहे. कारखाना कार्यक्षेञातील सभासदांच्या जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी चालू सिझनला 4 लाख बॅग उत्पादनाचे उद्दिष्ठ ठेवलेले असून कार्यक्षेञातील सभासदांनी पर्यावरणाचा –हास थांबविण्यासाठी व कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेणेसाठी कर्मयोगी सेंद्रीय खताचा वापर करावा असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास कारखान्याचे संचालक वसंत मोहोळकर, राजेंद्र गायकवाड, मानसिंग जगताप, मच्छिंद्र अभंग, भास्कर गुरगुडे व कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार आणि सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच प्रथम ग्राहक सभासद श्री. विजय फडतरे उपस्थित होते.
टिप्पण्या