माझी वसुंधरा अभियानांतर्गत इंदापूर नगरपरिषदेकडून वृक्षारोपण
इंदापुर: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक 2 ऑक्टोबर ते 31 मार्च 2021 कालावधीत 'माझी वसुंधरा अभियान ' राबवण्यात येत असून या योजनेअंतर्गत इंदापूर नगरपरिषदेने आज धनत्रोय दिवसाचे औचित्य साधत नवीन पाणीपुरवठा विभाग परिसरात नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण पूरक अभियानाची सुरुवात केली.
यावेळी वृक्षसंवर्धन जोपासण्याची शपथ उपस्थित नागरिक, कर्मचाऱ्यांनी घेतली. वृक्षारोपणासाठी कचरा डेपोवर तयार झालेले खत आणि मातीचा वापर करून या ठिकाणी विविध प्रकारच्या देशी आणि आणि फुलांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. भरत शहा मित्र परिवाराने वृक्षारोपणासाठी रोपे देऊन निसर्ग संवर्धन समाजहिताचे कार्य केले.
यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा,नगरसेवक भरत शहा, संतोष देवकर, हमीद आत्तार ,सुनील बोरा, मयूर गुजर, दादा जोशी, जितेंद्र विंचू, गजानन पुंडे, सहदेव व्यवहारे, सुरेश जकाते उपस्थित होते.
टिप्पण्या