इंदापूर : पुणे विभागातील शिक्षक मतदार संघामध्ये ७२,५४५ मतदार आहेत. पुणे विभाग शिक्षक मतदार संघामध्ये आता राष्ट्रीय
मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियनची प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटॉन) आणि बहुजन मुक्ती पार्टी पुरस्कृत उमदेवार सोलनकर रविंद्र चंदर हे निवडणूक लढवणार असल्याने आता या प्राध्यापक-शिक्षक आणि शिक्षकेत्तर संघटनेच्या
भुमिकेवर निवडणुकांचे निकाल अवलंबून असणार आहेत.आसे मत अॅड राहुल मखरे राष्ट्रीय महासचिव बहुजन मुक्ती पार्टी व गोरक्षनाथ बारवकर जिल्हाध्यक्षबहुजन मुक्ती पार्टी पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील मतदारांची संख्या विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदारांनी दाखल केलेले अर्ज स्विकारण्यात आलेले आहेत. त्यांची पुरवणी यादी तयार करण्यात आली आहे. एकुण ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे मतांची विभागणी होणार असल्याचे स्पष्ट आहे. मा.रविंद्र चंदर सोलनकर यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षक संघटनेकडून उमेदवारी दिल्यामुळे सोलनकर जिंकण्याच्या शिर्यतीत आल्याने पारंपारिक प्रस्तापित पक्षांच्या उमेदवारांपुढे आव्हान निर्माण होऊन पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील निवडणूक चुरशीची ठरणार आहे.आसेही मखरे म्हणाले ,पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचा निकालही शिक्षक संघटनांच्या भुमिकेवर अवलंबून आहे.
जिल्हा- मतदार पुणे-३२,२०१
सोलापूर -१३.५८४कोल्हापूर-१२,२३७
सातारा-७,७११सांगली-६,८१२
एकूण ७२,५४५ मतदार या शिक्षक मतदार संघात आहेत.प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संघ(प्रोटॉन) ची भूमिका निर्णायक ठरणार?पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील सांगली मधून सोलनकर रविंद्र चंदर तर पवार आणि सावंत सोलापूर जिल्ह्यातील, आसगावकर
कोल्हापूरमधील तर मनसेचे मानकर पुण्यामधील आहेत. शिक्षक मतदार संघातून एकूण ३५ उमेदवार रिंगणात आहेत.
१) शिक्षणाचे संपूर्ण खाजगीकरण करणारे नवीन शैक्षणिक धोरणास विधानपरिषदेत विरोध करुन रद्द करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आंदोलन
उभारणे.
२) एनपीएस योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणे.
३) शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करुन केजी ते पीजी शिक्षण मोफत व सक्तीचे करणे. त्यासाठी बजेटच्या १०% खर्च शिक्षणावर खर्च करणारा
कायदा करण्यास भाग पाडणे,
४) राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिन म्हणुन घोषित करणे.
५) शिक्षकांवर लादली जाणारी सर्व अशैक्षणिक कामे रद्द करणे.६) विना अट खाजगी माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालये शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीत व इतर कालबद्ध श्रेणींसह सेवात्तर्गत लाभ
देण्यासाठी पाठपुरावा करणे.
७) शिक्षण क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांची भरती केंद्रीय पद्धतीने शासकीय यंत्रणेमार्फत करणे.
८) खाजगी क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या शिक्षकांना अनुदानित शिक्षकांप्रमाणे नियमित मासिक वेतन देणारा कायदा लागू करणेव त्याची अमंलबजावणी न करणाऱ्या संस्था, शाळा, महाविद्यालये यांची मान्यता रद्द करणे.९) भाजपा, काँग्रेसने शिक्षण बंद करण्यासाठी षडयंत्रपुर्वक बंद केलेल्या डी.एड्., बी.एड्. महाविद्यालयांना पुनर्जिवित करणे.
१०) सीएचबी शिक्षकांना अर्धवेळ म्हणुन नियुक्ती देणे.
११) शिक्षकांचे संस्थाद्वारे होणारे आर्थिक, मानसिक शोषण थांबविण्यासाठी जिल्हा, विभाग, विद्यापीठ स्तरावर ग्रीव्हीएन्स् कमिटी शिक्षकव शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यामधून लोकशाही पद्धतीने नियुक्त करण्याच्या धोरणाचा पाठपुरावा करणे.
१२) पीएफच्या रक्कमेची खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक रद्द करून केवळ सरकारी व सार्वजनिक उद्योगांमध्ये गुंतवणुक करण्याचा कायदाअंमलात आणणे.
१३) मनपा/नपा मधील शिक्षकांना वैद्यकीय परिपुर्ती योजनेचा लाभ देणे.
वरील प्रकारच्या शिक्षकांच्या समस्या सोडविण्याठी, शिक्षकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी पुणे शिक्षक मतदार संघातून राष्ट्रीय
मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियनची प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग(प्रोटॉन) आणि बहुजन मुक्ती पार्टी
पुरस्कृत उमेदवार सोलनकर रविंद्र चंदर यांना उमेदवारी दिली आहे.या वेळी
अॅड. राहुलजी मखरे (राष्ट्रीय महासचिव - बहुजन मुक्ती पार्टी),गोरक्षनाथ बारवकर (जिल्हाध्यक्ष - बहुजन मुक्ती पार्टी, पुणे)
बाबासाहेब भोंग (अध्यक्ष - बहुजन मुक्ती पार्टी, इंदापूर तालुका),अशोक होले (अध्यक्ष - बहुजन मुक्ती पार्टी, दौंड तालुका) ,रामचंद्र भागवत(उपाध्यक्ष - बहुजन मुक्ती पार्टी, दौंड तालुका),सुरज धाईंजे (जिल्हाध्यक्ष - भारतीय युवा मोर्चा पुणे) ,संजय कांबळे, गौस सय्यद, पप्पू पवार, भारत मिसाळ हे हजर होते,
टिप्पण्या