इंदापूर तालुक्यातील कालठण नं.२ येथील एक एकरात १०३ टन ऊसाचे उच्चांकी उत्पादन
इंदापूर तालुक्यातील कालठण नं.२ येथील श्री.गोकुळ गोविंद मेंगडे या
शेतकऱ्याने एक एकरामध्ये १०३.०७८ मे.टन इतका ऊस उत्पादीत करून ऊस शेतीत
विक्रम केला आहे. मेंगडे यांना गुंठयाला २ टन ५७६ किलो इतका उतारा मिळालेला
आहे. त्यासाठी त्यांनी फक्त रू.२३,९००/- इतका खर्च केला आहे.
खत एकात्मीक खत व्यवस्थापनाअंतर्गत वापर करून विक्रमी ऊस उत्पादन घेतले आहे.
एक एकर क्षेत्रासाठी त्यांनी कर्मयोगी सेंद्रिय खत एकरी ३५ बॅग अँसिटोबॅक्टर व गोमुत्र
७ वेळा फवारणी, ॲझोटोबॅक्टर, पी.एस.बी., के.एम.बी. व जिवामृत ४ वेळा आळवणी
व शेणखत १० बैलगाडी असे खत व्यवस्थापन केले आहे.
खताविषयी माहिती देताना मेंगडे
कारखान्याची सेंद्रिय जैविक खते वापरून जास्त उत्पादन घेतल्यामुळे तसेच
कार्यक्षेत्रातील इतर सर्व ऊस उत्पादक सभासदांना मार्गदर्शनपर काम केल्यामुळे माजी
मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्षा भोसले यांच्या हस्ते मेंगडे
यांचा कारखाना सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे सर्व
संचालक मंडळ, कार्यकारी संचालक बी.जी.सुतार व सर्व अधिकारी उपस्थित होते.
कारखाना कार्यक्षेत्रातील माती नमुन्याच्या पृथ्थकरण अहवालानुसार कार्यक्षेत्रामधील
जमिनीतील सेंद्रिय कर्ब स्फुरद, झिंक, फेरस या अन्नदुव्याचे प्रमाण कमी झालेले असून
जमिनीची क्षारता, पी.एच. वाढला आहे. यासाठी उपाययोजना म्हणून सर्व मुख्य व
सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त असे कर्मयोगी सेंद्रिय खत कारखान्याने तयार केलेले आहे.
ऊस उत्पादक सभासदांनी मेंगडे यांचा आदर्श डोळयासमोर ठेवुन सेंद्रिय, जैविक व जिवामृत
इत्यादीचा संयुक्तीकपणे वापर करून कमी खर्चामध्ये व जमिनीची सुपिकता अबाधित
ठेवून जास्तीत जास्त ऊस उत्पादन घ्यावे. असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन
पाटील व उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांनी यावेळी केले.
श्री. मेंगडे यांनी त्यांचाच मागील सिझन २०१७-१८ मधील ९०.९८१ मे.टन
उच्चांक १०३.०७८ मे.टन उत्पादन घेवून मोडीत काढता आहे. तसेच यापुढे सभासदांनी
सेंद्रीय खते जास्त वापरावीत.आसे आवाहन चेअरमन हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे, हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंनस पाळून सॅनिटायझर व मास्कचा वापर करूनपार पडला आहे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कर्तव्य दक्ष, कार्यकारी संचालक बाजीराव.जी.सुतार यांनी केले तर सूत्रसंचालन कार्यालयीन अधिक्षक शरदराव काळे यांनी केले,
टिप्पण्या