इंदापूर तालुका प्रतिनिधी
स्वराज्याचे सरसेनापती संताजीराजे घोरपडे यांची ३७५ वी जयंती इस्लामपूर ता. माळशिरस येथील श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानच्या वतीने ( दि.१६ ) रोजी साजरी करण्यात आली.
यावेळी घोरपडवाडी ता. इंदापूर येथील अनेक युवक कार्यकर्ते, त्याचबरोबर गुजरात, कर्नाटक, सोलापूर ,सातारा, पुणे अशा अनेक भागातून घोरपडे यांचे वारसदार व अनेक मान्यवर या जयंती कार्यक्रमासाठी उपस्थित होते अशी माहिती राजेंद्र दुर्योधन घोरपडे यांनी दिली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या विचारात बोलताना म्हटले की,राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील गड, किल्ल्यांप्रमाणेच अनेक स्वराज्यरक्षक वीरांच्या समाधीस्थळांना सुद्धा पर्यटनाचा दर्जा द्यावा. हा ऐतिहासिक ठेवा जतन ठेवण्यासाठी राज्यसरकारने निधी उपलब्ध करुन देण्यात अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली.
यावेळी संजय घोरपडे (सचिव) श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान, रणधीर घोरपडे बहादुरवाडीकर,गिरीश घोरपडे मंगळापुर, दिलीप भोसले लोणी काळभोर (पुणे ), प्रशांत घोरपडे, तुकाराम घोरपडे हासेवाडी( सातारा ), राजेंद्र दुर्योधन घोरपडे (ता. इंदापूर ,घोरपडवाडी ), सचिन घोरपडे, तुकाराम घोरपडे, अतुल घोरपडे, प्रभाकर घोरपडे, सोमनाथ घोरपडे, संताजी उत्तमराव घोरपडे, सुरेश घोरपडे, नितीन घोरपडे, दत्तात्रय घोरपडे, बाबुराव घोरपडे, गणेश घोरपडे , राजेंद्र किसनराव घोरपडे, चेतन घोरपडे, काकासाहेब घोरपडे, मधुकर घोरपडे, किसन भांगे, संग्राम रणवरे, भरत माने, भानुदास पवार, शिवाजी पवार, अर्जुन पवार, प्रताप पवार, दत्तात्रय जाधव, सुधीर पवार, सुभाष काळे, जे.डी. माने, गणेश महामुने, आनंद शेंडगे, भाऊ माने आदी उपस्थित होते.
----------------------------------
शत्रूच्या छावणीचे कळस कापून आणणारे आणि शत्रूच्या सैन्यातील घोड्यांना पाण्यात दिसणाऱ्या या संताजीराजे समाधी स्थळ हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे आणि येणाऱ्या भावी पिढीला , युवकांना , छत्रपती शिवाजी महाराज , संभाजी महाराज , तानाजी मालुसरे , बाजीप्रभू देशपांडे, संताजीराजे अनेक शूर वीरांचा इतिहास शैक्षणिक कार्यक्रमात , अभ्यासक्रमात , आचरणात , राजकारणात , सामाजिक अनेक क्षेत्रात आत्मसात करण्यासाठी व उपयोगी पडावा म्हणून महाराष्ट्र सरकारने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील गड-किल्ल्यांचा अशा शूरवीरांच्या समाधी स्थळांचा त्यांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करावा असे आम्ही सर्व घोरपडे प्रतिष्ठानचे पदाधिकारी मागणी करत आहोत. येणाऱ्या काळात सरकारने याकडे दुर्लक्ष केले गेलं तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल. या शूरवीरांच्या समाधीस्थळांना पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे व विकास निधी विशेष करून उपलब्ध करावा.अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
टिप्पण्या