इंदापूर:प्रतिनिधी दि.14/11/20
आद्य क्रांती गुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२६ व्या जयंतीनिमित्त आज शनिवार (दि. १४ नोव्हें.) माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे प्रतिमेचे पुजन करून त्यांच्या कार्यास वंदन केले.
आद्य क्रांती गुरू वीर लहुजी वस्ताद साळवे जयंती कमीटी व मातंग एकता आंदोलन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, "मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी" असा संकल्प करून लहुजी वस्तादांनी देशासाठी चंदना प्रमाणे देह झिझवला. त्यांच्या तालमीत अनेक क्रांतीकारकांनी देशभक्ती व शक्ती प्रशिक्षण घेतले. त्यांच्या कार्यातून युवकांनी प्रेरणा घ्यावी. त्यांच्या जीवन संघर्षाची कहाणी आजच्या पिढीला मार्गदर्शक आहे. या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी देशासाठी जगण्याची प्रतिज्ञा करावी. आणि सामाजिक कार्यातून देशभक्तीची चळवळ उभारावी.तीच लहुजी वस्तादांना आपली मानवंदना असेल.'
यावेळी वृक्षारोपन, अनाथ आश्रमातील मुलांना फळवाटप करून हा जयंती सोहळा संपन्न होणार असल्याने आयोजकांचे त्यांनी कौतुक केले.
याप्रसंगी नगराध्यक्षा अंकिता शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, नगरसेवक भरत शहा, भाजपा शहराध्यक्ष शकील सय्यद,माजी नगरसेवक किसनबापू आडसूळ, पांडुरंग शिंदे उपस्थित होते.मातंग एकता आंदोलन पुणे जिल्हा उपाअध्यक्ष ललेंद्र शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार मानले.सूत्रसंचालन नगरसेवक कैलास कदम यांनी केले.
जयंती कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळासाहेब आडसूळ, रणजीत ढावरे, मुकुंद शिंदे, संजय खंडागळे, गणेश जाधव, सागर सोनवणे, चंदू आडसूळ, ज्ञानू सोनवणे, मयुर ढावरे, उमेश ढावरे, नंदू खंडागळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
_______________________________
टिप्पण्या