इंदापुर: सोमवार दिनांक १६ नोव्हेंबर 2020 रोजी बलिप्रतिपदा ( दिपावली पाडवा)च्या शुभमुहूर्तावर जनसामान्यांचे नेतृत्व मा. राजवर्धनदादा पाटील यांच्या शुभहस्ते श्री. वामन सोपान निंबाळकर यांनी लाखेवाडी चौफुला येथे सुरू केलेल्या हाॅटेल वैशाली गार्डन या नवीन व्यवसायाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
हॉटेल व्यवसायासाठी उत्तम व्यवस्थापन, ग्राहकांची तत्पर सेवा, आणि रूचकर अन्नपदार्थ आपल्या ग्राहकांना पुरवण्याच्या जोरावर नावारुपाला येतो. श्री. वामन निंबाळकर त्यासाठी अगदी खरे उतरतील कारण, स्वच्छ मनमोकळा स्वभाव, लोकसंग्राहकता, असणारा जनसंपर्क, व लोकांना आवडीने खावू घालण्याची वृत्ती हे अधिकचे गुण व्यवसायिक गुणवत्तेबरोच त्यांच्या कडे आहेत. म्हणूनच हे हॉटेल अल्पावधीच लोकप्रिय होईल.
.असा आशावाद व्यक्त करून *मा.राजवर्धनदादांनी श्री. वामन निंबाळकर व परिवाराला व्यवसायिक प्रगतीसाठी व भरभरसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या*. यावेळी मा. तानाजीराव नाईक, मा. विष्णू जाधव, मा. काशीनाथ अनपट, मा. किसन जाधव,मा. लक्ष्मीकांत नाईक,मा. बापूराव ढोले, मा. बापू भाळे, मा. पांडुरंग माने, मा. शिवाजी घोगरे, मा. वसंत नाईक, डाॅ. मनोज ढोले, मा.महेश निंबाळकर, मा.रामचंद्र नाईक,मा. शंकर कांळगे,मा. गणेश भिंगारदिवे, मा.भिमराव राऊत, मा. सोमनाथ नष्ट, मा. रविंद्र पानसरे,मा. पोपट चव्हाण, मा. अशोक चव्हाण, मा.पांडुरंग नाईक,मा. सतिश कदम, मा. तानाजी कुबडे, मा.विष्णू सानप, मा. किरण खुरंगे, व पोलीस पाटील मा. रामचंद्र निंबाळकर इ. मान्यवर उपस्थित होते,
टिप्पण्या