इंदापूर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आ.संजय जगताप यांनी दिवाळीच्या पूर्वसंधेला तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी पक्षाच्या जुणे-जाणते कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष भेटून राजकीय सद्यस्थितीचा आढावा घेवून तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीबाबत सकारात्मक चर्चा केली. पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
जिल्हा अध्यक्ष संजय जगताप यांचा इंदापूर तालुका दौरा या प्रकारे पार पडला या वेळी त्यांनी
1) सणसर येथे येणाऱ्या ग्रामपंचायत विषय नवीन कार्यकर्त्यांशी चर्चा केली , रोड व इतर मागण्याचे निवेदन स्वीकारले
2) वालचंदनागर हेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन केले , नवीन कार्यकर्ते पक्षा मध्ये प्रवेश संदर्भात चर्चा , येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकी विषयी अढावा
3 ) इंदापूर शहरात एका हाॅटेल वर पत्रकारांन सोबत दिवाळी निमित्त अनौपचारिक गपा
4) काँग्रेस पद्धधिकार्यांचा स्नेहा मेळावा , शहर युवक काँग्रेस सरचिटणीस पदी संदीप शिंदे यांची निवड , भूषण बोराटे जाचाकवस्ती यांचे असंघटीत सिने वर्कर सेल च्या तालुका अध्यक्ष पदी निवड
5) शहराचे जेष्ठ नागरिक गोकुळसेठ शहा यांची सदिच्छा भेट सर्व शहा कुटुंब उपस्तिथ
6) सोनई चे संस्थापक श्री दशरथ माने दादा व युवा नेते प्रवीण भया माने यांची त्यांच्या राहत्या घरी सदिच्छा भेट
7 ) अविनाश दादा घोलप वा माजी सभापती कारनसिंह घोलप यांनी त्यांच्या राहत्या घरी भेट व चर्चा आसा हा कार्यक्रम पार पडला ,
इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या स्नेह मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. जगताप म्हणाले की, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने एकत्रित येवून महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सरकार स्थापन केले आहे. सरकारला एक वर्ष कालावधी पूर्ण झाला आहे.
या काळात महाविकास आघाडीने अनेक प्रश्न सोडविले आहेत. सरकारने शेतकर्यांच्या कर्जमाफीसारखा महत्वाचा निर्णय घेतला. कोविड या महामारीवरही सरकारने चांगले काम केले आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सध्या पंचनामे करण्याचे काम सुरु असल्याचे सांगून ज्या ठिकाणचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्याठिकाणच्या नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरकाकडून भरपाई दिली असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या कामाचे कौतुक करुन त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण संपूर्ण ताकदीने उभे असल्याचे आ.जगताप यांनी सांगितले.
यावेळी युवक काँग्रेसच्या शहर सरचिटणीसपदी संदीप शिंदे तर असंघटीत सिने वर्कर सेल च्या तालुकाध्यक्षपदी भूषण बोराटे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र आ. संजय जगताप यांचे वतीने त्यांना देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा काँग्रेसचे सोमनाथ दौंडकर, तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत, जिल्हा सिने असंघटित कामगार सेल सचिन जाधव,वीरधवल गाडे,काका देवकर,जकिर काझी, बिभीषण लोखंडे, आबासाहेब निंबाळकर,शहराध्यक्ष अध्यक्ष तानाजी भोंग,चमनभाई बागवान,संतोष शेंडे, निवास शेळके,चेतन कोराटकर, प्रदीप शिंदे, भगवानराव पासगे, अमोल बंडगर, राहुल जाधव,राहुल आचरे, सुफियानखान जमादार, शंभूराजे साळुंखे, अरुण राऊत, श्रीनिवास पाटील, मिलिंद साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या