इंदापूर :प्रतिनिधी दि.26/11/20
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती ऊस वाहतुक करणा-या वाहनांना माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते गुरुवारी (दि.26) परावर्तक बसविण्यात आले. तसेच यावेळी वाहन चालकांचे वाहतूक नियमांसंदर्भात प्रबोधनही करण्यात आले.
ऊस वाहतुक करणा-या वाहन चालकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच घाईने व वेगाने वाहन चालवू नये, असे आवाहन यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले. तर अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी वाहन मालक व चालकांना अपघात टाळणेसाठी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी केले.
.याप्रसंगी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, इंदापूर महामार्ग केंद्राचे पोलीस निरीक्षक शंकरराव मुटेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे,
प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जामदार, भीमराव काळे, पांडुरंग शिर्के, प्र.कार्यकारी संचालक एस.जी.गेंगे पाटील, वाहन मालक व चालक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष घोगरे तर आभार संचालक मच्छिंद्र वीर यांनी मानले.
_______________________________
टिप्पण्या