कर्मयोगी सहकारी साखर कारखाना ट्रॅक्टर यार्ड मधील मा.श्री.हर्षवर्धनजी पाटील यांच्या उपस्थितीने ट्रक्टर चालक मालक यांना आश्चर्याचा सुखद धक्का
इंदापुर: आज पहाटे कर्मयोगी सहकारी साखर कारखाना ट्रॅक्टर यार्ड मधील मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील यांच्या उपस्थितीने ट्रक्टर चालक मालक यांना आश्चर्याचा सुखद धक्का आज मंगळवार दि. १७ नोव्हेंबर २०२० रोजी माजी मंत्री महाराष्ट्र राज्य मा. श्री .हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी उस कर्मयोगी सहकारी साखर कारखाना येथे आज सकाळी ६ .०० वाजता अचानक भेट देत , उस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर वाहक , बैलगाडी वाहतुकदार यांच्या सोबत चाय पे चर्चा करत त्यांच्या कामकाज व अडीअडचणी विषयी माहिती घेत ,कारखान्यातील प्रत्येक युनिटच्या कामगार व कर्मचारी यांची आपुलीकीने चौकशी करत मार्गदर्शक सूचना दिल्या व उत्तम कामकरणाऱ्याचे पाठीवर थाप टाकत कौतुक केले.
असे सर्वाचे आपुलकी आणि जिव्हाळा जपणारे हर्षवर्धन पाटील सर्वांचे मार्गदर्शक व कुटूंबप्रमुख म्हणून सर्वांचे काळजी घेतात. तो क्षण फारच सुखावणारा व आनंदाचा असतो. यांची अनुभूती उपस्थित सर्वांना आली
टिप्पण्या